नवी दिल्ली: Reliance Jio चा स्वस्त 4G स्मार्टफोन Jio Phone Next भारतात लाँच झाला असून त्याची किंमत ६,४९९ रुपये आहे. जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त १,९९९ रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल. उर्वरित रक्कम १८ महिने किंवा २४ महिन्यांच्या हप्त्यांमधून देता येईल . फोन ऑनलाइन तसेच ऑफलाइन मोडमधून Jio Phone Next खरेदी करता येईल. पाहा डिटेल्स. वाचा: ' ग्राहक थेट रिटेल स्टोअरमधून JioPhone Next स्मार्टफोन खरेदी करू शकतात. किंवा तुम्ही JioPhone Next आणि WhatsApp च्या अधिकृत वेबसाइटवरून फोन खरेदी करू शकाल. JioPhone नेक्स्ट चे WhatsApp बुकिंग कसे करावे? Whatsapp वर Hi लिहून ७०१८२७०१८२ या क्रमांकावर मेसेज पाठवून ग्राहक बुक करू शकतात. JioPhone Next च्या नोंदणीनंतर एक कन्फर्मेशन मेसेज येईल.यानंतर, ग्राहक जवळच्या JioMart रिटेल स्टोअरमधून JioPhone Next खरेदी करू शकतील वेबसाइटवरून JioPhone Next बुक करा : सर्व प्रथम https://ift.tt/3pLD9Md वेबसाइटवर क्लिक करा. त्यानंतर I am Interested या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि टर्म अँड कंडिशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल जिथून मोबाइल क्रमांकाची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर युजर्सना त्यांचा सध्याचा मोबाईल पत्ता, पिन कोड आणि फ्लॅट किंवा घराचा क्रमांक टाकावा लागेल. JioPhone Next EMI पर्याय : JioPhone Next चार हप्त्यांमध्ये खरेदी करता येईल. हे चार EMI पर्याय १८ आणि २४ महिन्यांच्या हप्त्यांसह येतात. या ईएमआयमध्ये तुम्हाला मोफत मोबाइल डेटा आणि कॉलिंग सुविधा दिली जाते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया - Always on Plan: या Plan मध्ये ग्राहकाला १८ महिन्यांसाठी ३५० रुपये आणि २४ महिन्यांसाठी ३०० रुपये द्यावे लागतील. यामध्ये ग्राहकाला दरमहा ५ GB डेटा आणि १०० मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळेल. Large Plan: यामध्ये, १८ महिन्यांच्या हप्त्यावर ५०० रुपये आणि २४ महिन्यांच्या हप्त्यासाठी ४५० रुपये दिले जातील. यामध्ये १.५ GB दैनंदिन डेटा मिळेल तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. XL Plan : यामध्ये दररोज २ GB उपलब्ध असेल. १८ महिन्यांच्या हप्त्यासाठी ५५० रुपये आणि २४ महिन्यांच्या हप्त्यासाठी ५०० रुपये भरावे लागतील. XXL Plan : यामध्ये दररोज २.५ GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग उपलब्ध असेल. यामध्ये १८ महिन्यांसाठी ६०० रुपये आणि २४ महिन्यांसाठी ५५० रुपये मासिक हप्ता भरावा लागेल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pRhHFC
Comments
Post a Comment