नवी दिल्ली: स्वस्त स्मार्टफोन च्या लाँच तारखेबाबत बराच काळ सस्पेंस कायम आहे. मात्र, आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मुकेश अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्ट JioPhone Next स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म केली आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितले की, JioPhone Next स्मार्टफोन दिवाळीपर्यंत भारतात लाँच केला जाईल. वाचा: पिचाई पुढे म्हणाले की, भारत कोविड- १९ मुळे खूप प्रभावित झाला असून या काळात फीचर फोनवरून स्मार्टफोनकडे जाणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत, फीचर फोनवरून स्मार्टफोनकडे जाणाऱ्या ग्राहकांसाठी JioPhone Next हा एक उत्तम स्मार्टफोन ठरणार आहे. हे प्रथमच इंटरनेट युजर्ससाठी शक्यतांचे नवीन दरवाजे उघडण्यासाठी कार्य करेल. हे भारतात डिजिटल परिवर्तनाचे साक्षीदार असेल. याचा परिणाम भारतात पुढील ३ ते ४ वर्षांपर्यंत पाहायला मिळेल. JioPhone Next साठी केवळ भारतच नाही तर आशिया पॅसिफिक ही मोठी बाजारपेठ असेल. JioPhone ची अपेक्षित किंमत JioPhone Next ची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, JioPhone Rs ३,४९९ रुपयांमध्ये मध्ये लाँच केला जाईल. JioPhone पुढील संभाव्य तपशील JioPhone Next स्मार्टफोन ड्युअल सिमसह ३ GB रॅम आणि ३२ GB इंटर्नल स्टोरेजसह येईल JioPhone Next स्मार्टफोन Snapdragon 215 प्रोसेसर सपोर्टसह येईल. तसेच गुगलने बनवलेली प्रागत ओएसचा वापर यात करण्यात आला आहे. JioPhone Next स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले दिला जाईल. हे ३२०DPI (डॉट्स प्रति इंच) स्क्रीन डेन्सिटीला सपोर्ट करेल. फोनला ५.५ इंच स्क्रीन मिळेल. त्याचा आस्पेक्ट रेशो १८ :९ असेल. JioPhone Next स्मार्टफोन २५०० mAh बॅटरीसह येईल आणि फोटोग्राफीसाठी JioPhone Next मध्ये ८ MP फ्रंट कॅमेरा आणि १३ MP रियर कॅमेरा दिला जाईल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bcdtjg
Comments
Post a Comment