नवी दिल्ली : Big Diwali सुरू झाला असून, हा सेल २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान चालेल. या फेस्टिव्ह सेलमध्ये सर्व स्मार्टफोन कंपन्यांचे डिव्हाइस उपलब्ध आहेत. यामध्ये Apple चा देखील समावेश आहे. जर तुम्ही या फोनला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. आयफोन १२ वर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः iPhone 12 ची किंमत आणि ऑफर आयफोन १२ सेलमध्ये ५३,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर १४,९५० रुपये एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय ऑफर मिळत आहे. यासोबतच, एसबीआयकडून १,२५० रुपये सूट दिली जात आहे. जर तुम्हाला बँक डिस्काउंट आणि पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास डिव्हाइसला फक्त ३७,७९९ रुपयात खरेदी करता येईल. iPhone 12 चे स्पेसिफिकेशन iPhone 12 मध्ये ६.१ इंच एचडी सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे. याचे वैशिष्ट्यं म्हणजे यामुळे डोळ्यांना कोणतेही नुकसान होत नाही. फोनमध्ये ए१४ बायोनिक प्रोसेसर दिला आहे. तसेच, MagSafe चार्जिंग टेक्नोलॉजी मिळते. आयफोन १२ मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात १२ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. डिव्हाइस आयओएस १५ ओएसवर काम करते. अन्य फीचर्सबद्दल सांगायचे तर फोनमध्ये दमदार बॅटरी दिली आहे. याशिवाय वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BkRx08
Comments
Post a Comment