Flipkart Big Diwali Sale आज रात्रीपासून होणार सुरू, स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत खरेदीची शेवटची संधी; पाहा डिटेल्स
नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी वर आज (२७ ऑक्टोबर) रात्री ११.५८ वाजल्यापासून सुरू होत आहे. दिवाळीच्या आधी स्वस्त खरेदी करण्याची ही शेवटची संधी आहे. ३ ऑक्टोबरला समाप्त होईल. या सेलमध्ये एसबीआय कार्ड वापरून पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट सूट मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआय आणि डिस्काउंट ऑफर देखील मिळेल. Flipkart Smart Upgrade प्रोग्राम अंतर्गत अर्ध्या किंमतीत फोन खरेदीची संधी देखील आहे. वाचा: या स्मार्टफोन्सवर मिळत आहे बंपर डिस्काउंट
- स्मार्टफोन ७,९९९ रुपयांऐवजी ६,९९९ रुपयात मिळत आहे. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आणि ६.५ इंच एचडी+ फुल स्क्रीन डिस्प्ल मिळतो.
- Realme C21 Y ला १०,९९९ रुपयांऐवजी ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
- F12 स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि ६००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनची किंमत १२,९९९ रुपये असून, यावर १ हजार रुपये सूट मिळेल.
- Poco F3 GT स्मार्टफोनला ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदीची संधी आहे. फोनमध्ये १२० हर्ट्ज टर्बो रिफ्रेश रेट मिळतो. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.
- Realme Narzo 50A स्मार्टफोनला १२,९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. यात ५० मेगापिक्सल कॅमेरा, ६००० एमएएचची बॅटरी आणि MediaTek Helio G८५ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो.
- Moto G60 स्मार्टफोनला २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदीची संधी आहे. यात ६००० एमएएच बॅटरी आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे.
- Infinix Hot 10 Play च्या ४ जीबी रॅमला ९,९९९ रुपये किंमतीत खरेदीची संधी आहे. फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी आणि ६.८२ एचडी+ डिस्प्ले सपोर्ट मिळतो.
- Realme Narzo 30 स्मार्टफोनला १४,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यात मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसर आणि ३० वॉट डार्ट चार्ज सपोर्ट दिला आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vM2wi1
Comments
Post a Comment