तुमच्या आवडत्या Facebook ने का बदलले नाव ? युजर्सवर कसा होणार परिणाम, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी ने आता आपल्या कंपनीचे नाव बदलून '' केले आहे. कंपनीचे सीईओ यांनी गुरुवारी याची घोषणा केली. नाव बदलाची माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. मात्र, कंपनीचे नाव का बदलण्यात आले? यामागे नेमके कारण काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वाचा: Facebook कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनी म्हणून ओळखली जाऊ नये अशी फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन कंपनी मेटाव्हर्स जगासाठी तयारी करत आहे. यासाठी कंपनी १० हजार लोकांना कामावर घेणार आहे. जे कंपनीला मेटाव्हर्स बनवण्यात मदत करतील . तुम्ही मेटाव्हर्सचा आभासी वास्तव म्हणून विचार करू शकता. मेटॉवर्स म्हणजे लोकांची उपस्थिती डिजिटल असेलले जग. ज्यात लोक एकमेकांना डिजिटल पद्धतीने भेटू शकतील. केवळ Facebook च नाही तर Microsoft सारख्या मोठ्या कंपन्या देखील मध्ये गुंतवणूक करत आहेत. झुकेरबर्ग बर्‍याच काळापासून व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. एकूणच Metaverse च्या जगात पुढे जाण्यासाठी फेसबुकने आपले नाव बदलून Meta असे केले आहे. यापुढे लोकांनी फेसबुक कंपनीला केवळ सोशल मीडिया कंपनी म्हणून ओळखू नये यासाठी कंपनीचा हा प्रयत्न आहे. आता नाव बदलल्यानंतर लवकरच कंपनीकडून अनेक मोठ्या घोषणाही समोर येऊ शकतात. युजर्सवर थेट परिणाम नाही : जे नाव बदलले आहे ते मूळ कंपनीचे आहे. म्हणजेच कंपनी म्हणून फेसबुकचे नाव बदलून मेटा करण्यात आले आहे. कंपनीचे इतर प्लॅटफॉर्म - Facebook, Instagram आणि WhatsApp याच नावांनी ओळखले जातील. म्हणजेच नाव बदलल्याने थेट युजर्सवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jNZuVA

Comments

clue frame