३०० रुपयाच्या EMI वर खरेदी करा जिओचा नवा स्मार्टफोन, रोज २.५ जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः JioPhone Next ची तुम्ही जर उत्सूकतेने वाट पाहत असाल तर फक्त थोडे दिवस थांबा. कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन दिवाळीपासून उपलब्ध होणार आहे. जिओ फोन नेस्क्टची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच या फोनला खास स्कीम अंतर्गत खरेदी करण्याची संधी आहे. युजर्संना हा फोन खरेदीसाठी फक्त १९९९ रुपये द्यावे लागतील. त्यानंतर बाकीची रक्कम युजर १८ ते २४ महिन्याच्या सोप्या EMI मध्ये करू शकता. EMI ऑप्शनसाठी कंपनीने चार प्रकारे प्लान आणले आहेत. यात सर्वात स्वस्त प्लान ३०० रुपये आणि सर्वात महाग प्लान ६०० रुपये प्रति महिना असा आहे. जिओ फोन नेक्स्टला खरेदी करणाऱ्या युजर्संना कंपनी ५०१ रुपयाची प्रोसिंग फी घेते. जाणून घ्या डिटेल्स. ऑलवेज ऑन प्लान या कॅटेगरीत दोन EMI ऑप्शन आहेत. यात एक प्रत्येक महिना ३०० रुपये EMI आणि दुसरा ३५० रुपये EMI चा प्लानचा समावेश आहे. ३०० रुपयाचा प्लानमध्ये तुम्हाला EMI २४ महिने पर्यंत चालेल. EMI सोबत कंपनी प्लानमध्ये ५ जीबी डेटा आणि प्रत्येक महिने कॉलिंगसाठी १०० मिनिट ऑफर करणार आहे. यात तुम्हाला प्रत्येक महिने ५ जीबी डेटा आणि १०० कॉलिंग मिनिट्स मिळतील. लार्ज प्लान यात ४५० रुपये आणि ५०० रुपयाचा मंथली EMI प्लान उपलब्ध आहे. ४५० रुपयाचा प्लानचा EMI २४ महिने आणि ५०० रुपयाचा प्लानचा EMI १८ महिन्यांपर्यंत चालणार आहे. दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला रोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळेल. XL प्लान या प्लानमध्ये ५०० रुपये आणि ५५० रुपयाचा मंथली EMI चा समावेश आहे. ५०० रुपयाचा प्लानचा EMI २४ महिन्यांपर्यंत चालणार आहे. तर ५५० रुपयाचा EMI १८ महिन्यांपर्यंत चालणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यात २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग बेनिफिट मिळेल. XXL प्लान यात तुम्हाला ५५० आणि ६०० रुपयाचा मंथली EMI ऑप्शन मिळेल. ५५० रुपयाचा प्लान २४ महिने आणि ६०० रुपयाचा प्लान १८ महिन्यांपर्यंत चालणार आहे. या दोन्ही मध्ये कंपनी २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर करणार आहे. वाचाः वाचाः वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vWhPVr

Comments

clue frame