आता DJ ची गरज नाही! साउंडकोर Select Pro पार्टी स्पीकर भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : ऑडियो बनवणारी कंपनी साउंडकोरने भारतात आपल्या पार्टी स्पीकर्स लाइनअपचा विस्तार केला आहे. कंपनीने 'सेलेक्ट प्रो' पार्टी स्पीकरला लाँच केले आहे. हे स्पीकर्स साउंडकोरद्वारे भारतात लाँच केलेल्या पार्टी स्पीकर्सच्या आधीच्या सीरिजपेक्षा वेगळे आहेत. स्पीकर १६ तास प्लेटाइम, बासअप टेक्नोलॉजी, कस्टमाइजेबल साउंड आणि लाइट सारख्या शानदार फीचर्ससह येतो. फ्लिपकार्टवर या स्पीकरला ७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ब्लॅक रंगात येणाऱ्या या स्पीकरवर १८ महिन्यांची वॉरंटी मिळते. वाचा: सेलेक्ट प्रो एक मजबूत डिझाइनसह येतो व कोठेही घेऊन जाण्यासाठी टॉपवर एक हँडल दिले आहे. या स्पीकरद्वारे तुम्ही बीट ड्रिव्हन लाइट शोसह कोठेही पार्टी करू शकता. एलईडी म्यूझिकशी जुळण्यासाठी ब्लिंक देखील करते. यात पार्टीकास्ट फीचर दिले असून, याद्वारे डिव्हाइसमध्ये लाइट आणि ऑडिओ सिंक्रोनाइज होतो, जेणेकरून पार्टीचा आनंद घेता येईल. ३०W चा दमदार साउंड आउटपुट स्पीकरमध्ये ३० वॉट साउंड आउटपूट दिला आहे. यामुळे तुम्ही आउटडोरमध्ये देखील पार्टी करू शकता. दोन कस्टमाइज्ड ड्राइव्हर्स आणि चार पॅसिव्ह रेडिएटर्ससह बासअप टेक्नोलॉजी बासला बूस्ट करते. स्पीकरमध्ये कस्टमाइज्ड EQ सेटिंग्स देखील असून, याद्वारे अ‍ॅपसह लिंक करता येईल. मिळेल १६ तासांचा प्लेटाइम या स्पीकरमध्ये ६,७०० एमएएचची बॅटरी दिली असून, यात १६ तासांचा प्लेटाइम मिळतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ वी५ आणि यूएसबी सी चार्जिंग सपोर्ट दिला आहे. पाण्यापासून सुरक्षेसाठी यात आयपीएक्स ७ रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे पूल आमि बीच पार्टीसाठी हा स्पीकर उत्तम आहे. यात चार्जिंगसाठी PowerIQ चार्ज-आउट टेक्नोलॉजी दिली आहे. दरम्यान, साउंडकोरने भारतात याआधी पार्टी स्पीकरची मोठी रेंज सादर केले आहे. यात साउंडकोर प्लेअर +, रेव्ह नियो आणि रेव्ह मिनीचा समावेश आहे. रेव्ह सीरिज लाँचनंतर बेस्ट सेलर राहिली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pI9d3m

Comments

clue frame