Daiwa ची पहिली वॉशिंग मशीन लाँच किंमत ८,००० पेक्षा कमी, पाहा फीचर्स

नवी दिल्ली : देशांतर्गत कंपनी ने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत भारतीय बाजारपेठेत सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन लाँच केले आहे. Daiwa चे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग ७kg ते ८kg या आकारात उपलब्ध आहे. ७.२ किलो आणि त्याहून अधिक आकाराच्या मशीनला मजबूत काच आणि गंजरोधक बॉडी डिझाइन मिळेल. तसेच, हे गॅजेट पाच वर्षांच्या वॉरंटीसह देखील येईल. वाचा: कंपनीनुसार, सर्व वॉशिंग मशीन उच्च-गुणवत्तेच्या मटेरियलपासून बनवल्या गेल्या आहेत. या वॉशिंग मशिन्सचा राउंड प्रति मिनिट १३०० RPM आहे. याशिवाय उच्च स्पाइन स्पीड आणि दोन वॉश प्रोग्राम मशीनसोबत उपलब्ध असतील. मशिनसोबत मॅजिक फिल्टरही उपलब्ध असेल. या मशिन्ससोबत कॉलर स्क्रबरही देण्यात आला आहे. यंत्रासोबत चाकेही देण्यात आली आहेत. Daiwa या वॉशिंग मशीनची सुरुवातीची किंमत ७,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. थॉमसन आणि अमेरिकन कंपनी व्हाईट-वेस्टिंगहाऊस यांच्याशी स्पर्धा होईल. याशिवाय कॅन्डेसचे वॉशिंग मशिन देखील या श्रेणीतील भारतीय बाजारपेठेत आहे. Daiwa ने गेल्या आठवड्यातच 'Daiwa-li Smart Utsav Offers' लाँच केली आहे. Daiwa च्या या स्मार्ट उत्सव ऑफर अंतर्गत, त्याचे एलईडी आणि स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीने खरेदी केले जाऊ शकतात. Daiwa च्या या सेलमध्ये, २४ इंच ते ५० इंचापर्यंतच्या 4K UHD स्मार्ट टीव्हीवर सवलत उपलब्ध असेल. कंपनी आपल्या स्मार्ट टीव्हीवर १० महिने शून्य टक्के ईएमआय देखील देत आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत घेता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vMPRLD

Comments

clue frame