नवी दिल्लीः यूजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कंपनीने आपल्या ९९९ रुपयाच्या पोस्टपेड प्लानला बिलिंग सिस्टममधून हटवले आहे. कंपनीचा हा प्लान १ सप्टेंबर पासून डिसकंटिन्यू करण्यात आला आहे. त्यामुळे आता बीएसएनएल युजर या प्लानला सब्सक्राईब करू शकणार नाहीत. कंपनीने ९९ रुपयाच्या प्लानचे सध्याचे युजर्संना १९९ रुपयाच्या प्लानकडे वळवले आहेत. त्यामुळे त्यांच्या मंथली रेंटल मध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. ९९ रुपयाच्या प्लानचे युजर्सला या महिन्यात वाढवलेल्या चार्ज सोबत मोबाइल बिल रिसीव्ह करण्यात आले आहे. यामुळे अनेक युजर्संना मोठा झटका बसला आहे. काही युजर्संने याला कस्टमर केअर वर कॉल करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्टोब २०२१ च्या बिलामध्ये कंपनीने १०० रुपयाचे अतिरिक्त सिक्योरिटी डिपॉझिट जोडले होते. त्यामुळे युजर्संचे मागील प्लान आता मंथली रेंटल १९९ रुपये झाले आहे. ज्या युजर्संना आधी ९९ रुपये प्लस जीएसटी चे बिल मिळत होते. त्यांना आता प्लान रिवाइज झाल्यानंतर २९९ रुपये प्लस जीएसटीचे बिल मिळू शकते. हे युजर घेवू शकतात ९९९ रुपयाच्या प्लानचा फायदा बीएसएनएलने म्हटले की, ९९ रुपयाचा प्लान हटवल्यासोबत याच्या सब्सक्राईबर्सला कंपनीने आता सर्वात स्वस्त मंथली रेंट प्लान म्हणजेच १९९ रुपयांवर मायग्रेट केले आहे. यासोबतच बीएसएनएलने स्पष्ट केले की, ज्या युजर्सनी ९९ रुपयाचा प्लान वार्षिक पेमेंट स्कीम अंतर्गत सब्सक्राईब केला होता. ते अजूनही त्यावर कायम राहतील. या युजर्संना कंपनी वार्षिक पेमेंट किंवा अडवॉन्स्ड रेंटल पीरियड संपल्यानंतर १९९ रुपयाच्या प्लानवर शिफ्ट केले जातील. १९९ रुपयाच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट बीएसएनएलचा हा पोस्टपेड प्लान देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट सोबत येतो. प्रत्येक दिवशी १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला २५ जीबी डेटा मिळतो. कंपनी या प्लानमध्ये ७५ जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिट्स सुद्धा देत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZyOHXT
Comments
Post a Comment