नवी दिल्लीः फेस्टिव्ह सीजन मध्ये जर तुम्हाला एक नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा विचार करीत असाल तर Kodak तुमच्यासाठी ४३ इंच आणि ५० इंचाचे नवीन स्मार्ट टीव्ही आणले आहे. कंपनीने या नवीन सीरीजचे नाव CA Pro ठेवले आहे. नवीन टीव्हीत डॉल्बी ऑडियो सोबत अनेक जबरदस्त फीचर दिले आहे. ४३ इंचाच्या CA Pro स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. याच्या ५० इंचाच्या व्हेरियंटची किंमत ३३ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही टीव्हीला फ्लिपकार्टच्या सेलमध्ये २८ ऑक्टोबर पासून खरेदी करता येवू शकते. अर्ली अॅक्सेस मेंबर्ससाठी आजपासून उपलब्ध होणार आहे. कोडॅक सीए प्रो स्मार्ट टीव्हीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन कोडॅकची ही नवीन टीव्ही सीरीज वर्क फ्रॉम होम करीत आहे. युजर्ससाठी जबरदस्त आहे. यात व्हिडिओ मीटिंग्स, डॉक्यूमेंट्स अॅक्सेससाठी क्रोमकास्ट दिले आहे. याशिवाय, टीव्हीत तुम्हाला गुगल क्लासरूम आणि यूट्यूब सारखे बिल्ट इन अॅप सुद्धा मिळते. अँड्रॉयड टीव्ही १० ओएस वर काम करणाऱ्या या टीव्हीत ARM Cortex A53 SoC दिले आहे. दमदार साउंडसाठी कंपनी टीव्हीत ४० वॉटचे ऑडियो आउटपूट ऑफर करीत आहे. या टीव्हीत जबरदस्त साउंड आउटसाठी Dolby MS12 आणि DTS TruSurround चा सपोर्ट दिला आहे. टीव्हीत जर तुम्हाला गुगल आयडी ने साइन केले असेल तर तुम्हाला प्ले स्टोरवर ६ हजारांहून जास्त अॅपचे अॅक्सेस मिळेल. कनेक्टिविटीसाठी या टीव्हीत HDMI 3 पोर्ट, यूएसबी 2.0 पोर्ट आणि ब्लूटूथ वर्जन 5.0 दिले आहे. यासोबतच या टीव्हीत तुम्हाला बँड वाय फाय सुद्धा मिळेल. टीव्हीचा रिमोट सुद्धा खास आहे. यात गुगल प्ले स्टोर, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्ससाठी डेडिकेटेड बटन दिले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jIzj2x
Comments
Post a Comment