नवी दिल्ली : इंडियाने दमदार कामगिरी केली असून, भारतात नंबर १ स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही कंपनी असलेल्या शाओमीने गेल्या तीन वर्षात ७० लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री केली आहे. शाओमीचा पहिली स्मार्ट टीव्ही २०१८ मध्ये लाँच झाला होता. त्यानंतर कंपनीने जवळपास ७० लाख टीव्हींची विक्री केली आहे. शाओमीने काही दिवसांपूर्वीच ब्रँड अंतर्गत स्मार्ट टीव्ही सादर केले आहेत. कंपनीनुसार, भारतीय बाजारात सर्वाधिक मागणी इंच, इंच आणि इंच या टीव्हींची आहे. वाचाः या कामगिरीवर बोलताना शाओमी इंडियाचे स्मार्ट टीव्ही कॅटेगरी प्रमुख ईश्वर नीलकांतन म्हणाले की, स्मार्ट टीव्ही व्यवसाय हा २०१८ ते २०२१ पर्यंत दुप्पट झाला आहे व या कामगिरीबाबत आम्हाला अभिमान आहे. भारतीय ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबाबत आम्ही आनंदी आहोत. आम्ही बाजारात पोर्टफोलियोचा विस्तार करत राहू. येणाऱ्या काळात आम्ही नवीन टेक्नोलॉजी आणि फीचर्ससह टीव्ही सादर करू, जेणेकरून ग्राहकांना शानदार अनुभव मिळेल. इंडिया नवनवीन ४के टीव्हींची रेंज सादर केली जात आहे. भारतीय बाजारात याआधी केवळ एमआयचे टीव्ही होते, मात्र आता रेडमी स्मार्ट टीव्ही देखील उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात कंपनीचे केवळ स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. कंपनीचा उद्देश नॉन-स्मार्ट यूजर्सला स्मार्ट टीव्हीकडे वळवणे हा आहे. गेल्या महिन्यात रेडमी इंडियाने रेडमी सीरिज अंतर्गत टीव्हीचे दोन नवीन मॉडेल भारतीय बाजारात सादर केले आहेत. यात ३२ इंच आणि ४३ इंच मॉडेलचा समावेश आहे. या दोन्ही टीव्हींना ऑल राउंड स्मार्ट इंटरटेनमेंट एक्सपीरियन्ससाठी सादर केले आहेत. यात DTS व्हर्च्यूअल एक्स, अँड्राइड टीव्ही ११, ड्यूल बँड वाय-फाय, ऑटो लो लेटेंसी मोड, पॅचवॉल ४, डॉल्बी ऑडिओ सारखे फीचर्स दिले आहेत. या टीव्हींची किंमत १५,९९९ रुपयांपासून सुरू होते. वाचाः वाचाः वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XTv4tc
Comments
Post a Comment