फेक न्यूज विरुद्ध मोदी सरकार आक्रमक, फेसबुककडून मागितली ही माहिती, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने फेकिंग न्यूज संबंधी आता कडक पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारने दिग्गज टेक कंपनी फेसबुकला पत्र पाठवले आहे. केंद्र सरकारने या पत्रात फेसबुकला विचारले आहे की, हेट स्पीच आणि फेक न्यूज संबंधी काय पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारकडून फेसबुकला सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. सोशल मीडिया वर पसरवण्यात येत असलेल्या हेट स्पीचवर लगाम घालण्यासाठी काय काय केले आहे. तसेच कंपनीने कोणता अल्गोरिदम यूज केला आहे. फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर फेक न्यूज आणि हेट स्पीच रोखण्यात अयशस्वी राहिल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कडक भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने पत्र पाठवून उत्तर देण्यास सांगितले आहे. फेसबुकचे भारतात ४० कोटीहून जास्त युजर्स भारत सरकारचे हे पाऊल खूपच महत्त्वाचे आहे. कारण, इंटरनल डॉक्यूमेंट वरून उघड होते की, भारत चुकीच्या सूचनाचा आणि हेट स्पीचवरून अनेक स्तरांवर संघर्ष करीत आहे. त्यामुळे भारतात बऱ्याचवेळा हिंसाचार झाला आहे. हेट स्पीड आणि चुकीच्या सूचना पसरवण्यासाठी सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये भारतात फेसबुक एक मोठे मार्केट आहे. भारतात फेसबुकचे जवळपास ४० कोटी हून जास्त युजर्स आहेत. केंद्र सरकारने फेसबुकला पत्र पाठवले असले तरी फेसबुककडून अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक आणि केंद्र सरकार यांच्यात बरेच खटके उडाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने याआधी शेकडे चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. देशातील सुरक्षे संबंधी कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे केंद्र सरकारचे धोरण राहिलेले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nBsxg9

Comments

clue frame