४५०० रुपयात खरेदी केला १८ हजाराचा फोन, मिळाला साबण, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः बंपर डिस्काउंट सोबत ऑफर केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमुळे कोणालाही भुरळ पडते. परंतु, या ऑफर्सवर डोळे झाकून विश्वास ठेवणे खरंच महागात पडू शकते. नुकतेच असे एक प्रकरण समोर आले आहे. युजर्सला १८ हजार रुपये किंमतीचा २५०० रुपयात ऑफर केला जात होता. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या युजर्सने या ऑफर अंतर्गत स्मार्टफोन ऑर्डर केला त्या युजर्सला स्मार्टफोन ऐवजी साबण मिळाला आहे. सेंटरवरून होत होता सर्व खेळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप सारे युजर फेक कॉल सेंटरवरून याचे लक्ष्य झालेले आहे. या इंटरनेट स्कॅमला फेक कॉल सेंटर आणि महिला एग्जिक्यूटिव्हच्या मदतीने हे सर्व केले जात होते. कॉल सेंटरची महिला एग्जिक्युटिव्ह साध्या भोळ्या युजर्संना कॉल करून फसवण्याचे काम करीत होती. यात युजर्संना कॉम्बो डील अंतर्गत १८ हजार रुपयाचा स्मार्टफोन फक्त ४५०० रुपयात ऑफर केला जात असल्याचा दावा केला जात होता. ही डील फक्त मर्यादीत कालावधीसाठी असल्याने लवकर निर्णय घेण्याचा दवाब वाढवला जात होता. टिप्सटरच्या माहितीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप फेक कॉल सेंटरकडून करण्यात येणाऱ्या कॉलमध्ये युजर्संना सांगितले जात होते की, त्यांचा एक मोबाइल नंबर सिलेक्ट झाला आहे. ही एक खास ऑफर फक्त एका दिवसासाठी आहे. याची माहिती एका टिप्स्टरने पोलिसाना दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपींना अटक सोमवारी पोलिसांना पूठ कला गावात एक फेक कॉल सेंटर असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्या कॉल सेंटरवर छापा मारला. या छाप्यात २६ महिला सह दोन पुरुषांना रंगेहात पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले सर्व जण युजर्संना स्वस्त फोनची ऑफर देवून त्यांच्यासोबत फ्रॉड करीत होते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bf7DO3

Comments

clue frame