मनगटावर बांधताच शूगर टेस्ट करणार ही स्मार्टवॉच, ब्लड काढण्याची गरज पडणार नाही

नवी दिल्लीः अॅपलने नुकतीच वॉच सीरीज ७ ला जागतिक स्तरावर लाँच केले आहे. तसेच वॉच सीरीज ८ संबंधी अफवा आधीपासूनच इंटरनेटवर पसरवली जात आहे. आधी हे सांगितले की, एक अॅपल सप्लायर्सने एक सेन्सरचे परीक्षण सुरू केले आहे. जे ब्लड शूगर लेवल आणि ब्लड अल्कोहोल लेवलची मोजणी करू शकतील. डिजीटाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, एनोस्टार आणि तायवान आशिया सेमीकंडक्टर एक इन्फ्रारेड सेन्सर वर काम करीत आहे. जे ब्लड शूगर लेवल मोजण्यात सक्षम असेल. रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, सेन्सर १००० एनएम वरच्या वेवलेंथचा उपयोग करतो. एक फोटोडायोड सोबत काम करतो. जो ब्लड शूगर लेवलची माहिती उघड करू शकतो. हे युजर्सची नस आणि ब्लड ऑक्सिजनचे विश्लेषण करण्याचा प्रबंध सुद्धा करू शकतो. ब्लड शूगरला सध्या एका बोटात सुई टोचून रक्त काढले जाते. त्यानंतर शूगरची तपासणी केली जाते. परंतु, जर अॅपल वॉच याला सेन्सरच्या द्वारे मोजू शकत असेल तर हा एक गेम चेंजर फीचर होऊ शकतो. हे सेन्सर मधुमेह आणि अन्य संबंधित चिकित्सा समस्याच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर होऊ शकते. आयओएस १५ मध्ये हेल्थ अॅप मध्ये ब्लड ग्लूकोजचा एक पर्याय जोडला आहे. परंतु, हे व्हॅल्यू आता मॅन्यूअल रूपाने जोडले जाणार आहे. अॅपल वॉच सीरीजची किंमत अॅपल वॉच सीरीज ७ च्या बेस 41mm अॅल्यूमिनियम केस व्हेरियंटची किंमत ४१ हजार ९०० रुपये आहे. 45mm अॅल्यूमिनियम केस व्हेरियंट ची किंमत ४४ हजार ९०० रुपये आहे. दोन्ही व्हेरियंटच्या सेल्यूलर मॉडलची किंमत अनुक्रमे ५० हजार ९०० रुपये आणि ५३ हजार ९०० रुपये आहे. ही मिडनाइट, स्टारलाइट, ग्रीन, ब्लू आणि प्रोडक्ट रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. स्टेनलेस स्टील व्हर्जन ४१ मिमी सेल्युलर व्हेरियंट साठी ६९ हजार ९०० रुपये आणि ४५ मिमी सेल्युलर व्हेरियंटसाठी ७३ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EpgvNO

Comments

clue frame