नवी दिल्लीः जर तुम्हाला एक दमदार कॅमेराचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला १०८ मेगापिक्सल कॅमेराचा स्मार्टफोन १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येवू शकतो. फ्लिपकार्ट सेल २ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या फोनमध्ये फक्त कॅमेराच नाही तर या फोनची बॅटरी आणि डिस्प्ले सुद्धा दमदार आहे. जाणून घ्या या फोनची किंमत ऑफर्स आणि खास फीचर्स संबंधी. Motorola G60 ची किंमत आणि ऑफर्स मोटोरोलाच्या या स्मार्टफोनला एकाच व्हेरियंट मध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मध्ये आणले आहे. लाँचिंग वेळी या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली होती. परंतु, या सेलमध्ये या फोनला १५ हजार ९९९ रुपयात विकले जात आहे. SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर केल्यास १२५० रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकते. या फोनची किंमत कमी होवून १४ हजार ७४९ रुपये होईल. म्हणजेच या फोनला १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. Moto G60 स्मार्टफोन मध्ये ६.८० इंचाचा मॅक्स व्हिजन फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि अँटी-फिंगरप्रिंट कोटिंग सोबत येते. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर दिले आहे. फोनचे स्टोरेज तुम्हाला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येवू शकते. सिक्योरिटीसाठी यात मागच्या बाजुला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. हा देशातील सर्वात स्वस्त १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा फोन्सपैकी एक आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फोन दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 20W टर्बोपावर चार्जिंग सपोर्ट करते. याशिवाय, फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, गूगल असिस्टेंट साठी वेगळे बटन आणि दोन कलर ऑप्शन दिले गेले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bwG2It
Comments
Post a Comment