नवी दिल्ली : ने वरून १५० पेक्षा अधिक बनावट अॅप्सला बॅन केले आहे. हे १५० बनावट नावाच्या कॅम्पेनचा भाग होते. यात महागड्या प्रीमियम एसएमएस सेवांसाठी साइन अप करण्यासाठी पैसे घेतले जात होते. यामुळे यूजर्सला आर्थिक नुकसान होत असे. या अॅप्सला प्ले स्टोरवरून १०.५ मिलियनपेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले होते. वाचा: UltimaSMS स्कॅम कॅम्पेनबाबत चिंताजनक बाब म्हणजे, हे एका देशापर्यंत मर्यादित नाही. इजिप्त, सौदी अरेबिया, पाकिस्तान, युएई, तुर्की, ओमान, कतार, कुवैत, अमेरिका आणि पोलंडसह अनेक देशातील अँड्राइड यूजर्सला याचा फटका बसला आहे. असे काम करते SMS Scam Apps रिपोर्टनुसार, यूजरने गुगल प्ले स्टोरवरून या अॅप्सला डाउनलोड केल्यानंतर हे यूजर्सचे लोकेशन आयएमईआय नंबर आणि फोन नंबरची माहिती घेते, जेणेकरून फसवणुकीसाठी लोकेशन कोड व भाषा कोणती वापरली जाते याची माहिती मिळेल. अॅपला ओपन केल्यानंतर त्यावर स्थानिक भाषेत मोबाइल नंबर नोंदवण्यासाठी सांगितले जाते. पूर्ण माहिती भरल्यानंतर प्रीमियम एसएमएस सेवांची सदस्यता घेण्यासाठी देश व यूजर्सनुसार महिन्याला ४० डॉलर्स (जवळपास ३ हजार रुपये) शुल्क घेतले जाते व यानंतर अॅप काम करत नाही. या अॅप्सचा उद्देश केवळ लोकांकडून पैसे उकळणे हा आहे व एकदा पेमेंट केल्यानंतर काम बंद होते. Google Play Store वरील या बनावट अॅप्सपासून राहा सावध
- तुम्ही प्रीमियम एसएमएस पर्याय बंद करू शकता. यामुळे तुम्हाला अशा स्वरुपात बनावट मेसेज येणार नाही.
- अॅप डाउनलोड करण्याआधी रिव्ह्यू तपासा. यावरून लक्षात येईल की अॅप बनावट आहे की नाही.
- तुम्हाला अॅप योग्य वाटत नसल्यास त्यात फोन नंबर नमूद करू नका.
- माहिती भरण्याआधी अॅपसंदर्भात सर्व गोष्टी तपासा.
- Google Play Store अथवा Apple's App Store वरूनच कोणतेही अॅप डाउनलोड करा.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GkNO6t
Comments
Post a Comment