ट्रूकॉलरमध्ये आहेत 'हे' कामाचे फीचर्स, स्पॅम कॉल्स-एसएमएसपासून होईल बचाव; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : आज प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनमध्ये एक वेगळे उपलब्ध असते. कॉलिंग व एसएमएसची माहिती देण्यासाठी असेच एक अ‍ॅप उपयोगी येते, ते म्हणजे . बनावट आणि मेसेजपासून वाचण्यासाठी या अ‍ॅपचा वापर लाखो यूजर्स करतात. तसेच, अनोळखी नंबर कोणाचा आहे याचीही माहिती मिळत. ट्रूकॉलरमधील असेच काही फीचर्स जाणून घेऊया, जे तुमच्या खूपच उपयोगी येतील. वाचाः अ‍ॅपमधील कॉलर आयडी फीचरच्या मदतीने तुम्हाला आलेला कॉल हा ओळखीच्या व्यक्तीचा आहे की टेलिमार्केटिंग कंपनीचा आहे हे त्वरित समजते. ट्रूकॉलर अ‍ॅपमध्ये स्पॅम कॉल्सला ब्लॉक करण्याची सुविधा मिळते, जेणेकरून बनावट कॉल्स येणार नाहीत. तसेच, चॅटिंग, एसएमएस आणि कॉलिंगची देखील सुविधा यात दिली आहे. ट्रूकॉलर अ‍ॅप ऑर्गनाइज्ड आणि स्पॅम फ्री इनबॉक्सची सुविधा देते. याद्वारे तुम्ही तुमच्या मेसेजची खासगी, महत्त्वाचे आणि स्पॅम अशा कॅटेगरीमध्ये विभागणी करू शकता. तसेच, या अ‍ॅपचे आणखी एक खास फीचर म्हणजे तुम्ही नंबर सर्च करून तो कोणाचा आहे हे जाणून घेऊ शकता. ट्र्रूकॉलरमध्ये फोन कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा मिळते. तुम्हाला जर कॉलला रेकॉर्ड करायचे असल्यास कॉल रेकॉर्डिंग फीचर उपयोगी येईल. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EuF7Vv

Comments

clue frame