नवी दिल्ली: या दिवाळीत तुम्ही तुमच्या गावी किंवा नातेवाईकांच्या घरी प्रवास करायच्या विचारात असालच. आणि जर हा प्रवास तुम्ही ट्रेनने करणार असाल तर या प्रवासात काही गॅजेट्स सोबत असतील तर प्रवास आधी आनंददायक सहज होऊ शकतो. घरी, तुम्हाला अशा कोणत्याही गॅझेटची गरज भासणार नाही. मात्र, प्रवासादरम्यान अनेक वेळा तुम्हाला या गॅजेट्सची गरज भासते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गॅजेट्सबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. वाचा: पावरबँक : प्रवासादरम्यान अनेक वेळा ट्रेनमध्ये पॉवर सॉकेट मिळत नाही, ट्रेनमध्ये पॉवर सॉकेट्स नक्कीच असतात पण जर जास्त लोक त्याचा वापर करत असतील तर तुम्हाला बराच वेळ थांबावे लागेल. अशा परिस्थितीत, नेहमी १०००० mAh पॉवर बँक सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन किमान दोनदा चार्ज करू शकता. यूएसबी लाईट : ट्रेनमधील बहुतेक दिवे रात्री बंद असतात, त्यामुळे जर तुम्हाला प्रकाशाची गरज असेल, तर नेहमी सोबत USB लाईट ठेवावी जी तुम्ही पॉवर बँकेच्या मदतीने सहज वापरू शकता आणि त्यात भरपूर पॉवर असते. ट्रायपॉड : प्रवासात बहुतेक लोक त्यांच्या स्मार्टफोनवर चित्रपट पाहतात. परंतु, असे करणे खूप कठीण आहे. कारण, स्मार्टफोन जास्त वेळ हातात ठेवणे जरा त्रासदायक आहे आहे. अशा स्थितीत नेहमी पोर्टेबल ट्रायपॉड सोबत ठेवा. चित्रपट पाहताना याचा उपयोग होतो. वायरलेस इअरबड्स: प्रवास करताना नेहमी वायरलेस इयरबड्स सोबत ठेवा, ते वापरण्यास अतिशय सोपे आहेत आणि सहज चार्ज होतात. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Eh9oHc
Comments
Post a Comment