Airtel यूजर्स सावधान! केवायसीच्या नावाखाली यूजर्सला लुबाडले, फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ काम

नवी दिल्ली : ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात वाढ झाली असून, गुन्हेगार नवनवीन पद्धती शोधत आहे. बनावट मेसेज आणि अ‍ॅपद्वारे लुबाडले जात आहे. टेलिकॉम कंपन्यांनी देखील ग्राहकांना चेतावणी दिली आहे की फोनवर कोणालाही माहिती देऊ नये. आता एअरटेलचे सीईओ यांनी ग्राहकांना वाढत्या सायबर फसवणुकीबाबत चेतावणी दिली आहे. वाचाः त्यांनी काही दिवसांपूर्वीच घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. यात गुन्हेगाराने स्वतः कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगत केवायसी अपडेटच्या नावाखाली ग्राहकाची फसवणूक केली. गोपाल विठ्ठल यांनी सर्व ग्राहकांना अशा घटनांबाबत सावध राहण्यास सांगितले आहे. ने यूजर्सला केले सावध Airtel च्या CEO गोपाल विठ्ठल यांनी सांगितले की, बनावट यूपीआय वेबसाइट हँडल आणि बनावट ओटीपीसह फसवणुकीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. काही बनावट UPI अ‍ॅपसह ई-कॉमर्स ज्या सुरुवातीला चांगल्या वाटतात, मात्र आणि BHIM शब्दांचा वापर करतात. या अ‍ॅप्सला डाउनलोड केल्यास अथवा वेबसाइट्सवर बँकेची माहिती शेअर केल्यास गुन्हेगारांपर्यंत संपूर्ण माहिती पोहचते. कोणासोबतही शेअर करू नका ओटीपी ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची बँकिंग माहिती व ओटीपी शेअर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ओटीपी शेअर केल्यास बँक खाते रिकामे होईल. तसेच, विठ्ठल यांनी अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी काय करायला हवे त्याची माहिती दिली आहे. त्यांनी खासगी, बँकिंग माहिती, कस्टमर आयडी, ओटीपी, एमपी, मेसेज अथवा ईमेल शेअर करू नये असे म्हटले आहे. त्वरित डिलीट करा बनावट मेसेज सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ईमेल अथवा एसएमएसच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करू नये. असे बनावट एसएमएस त्वरित डिलीट करावे. अशा स्पॅम लिंकवर क्लिक करणे देखील टाळावे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BpcIhk

Comments

clue frame