108MP कॅमेरासह लाँच होऊ शकतो Samsung S22 Ultra, टेक टिप्स्टर ने केला खुलासा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Samsungचा आगामी स्मार्टफोन त्याच्या लाँचच्या आधीपासून चर्चेत आहे. या डिव्हाइसचे अनेक अहवाल देखील लीक झाले आहेत. आता टेक टिपस्टर IceUniverse ने या आगामी स्मार्टफोनशी संबंधित काही वैशिष्ट्ये उघड केली आहेत. जाणून घेऊया. वाचा: टेक टिपस्टर IceUniverse नुसार, Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनचीडिझाईन iPhone 13 सारखीच असेल. त्याचा पुढचा आणि मागचा भाग फ्लॅट असेल. मात्र त्यात खाच दिली जाणार नाही. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. मुख्य लेन्स १०८ MP असेल. याला १२ MP लेन्स आणि दोन १० MP सेन्सर दिले जातील. मात्र, या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. याशिवाय स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी मिळू शकते. S22 Ultra ची बॅटरी ३५ मिनिटांत ७० टक्के चार्ज होईल. असा दावा केला जात आहे. Samsung S22 Ultra : किंमत Samsung S22 Ultra स्मार्टफोनची किंमत,लाँच आणि फीचर्सबद्दल सॅमसंगने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण नुसार, हा स्मार्टफोन ग्रीन कलर ऑप्शन मध्ये येऊ शकतो आणि त्याची किंमत प्रीमियम रेंजमध्ये ठेवली जाऊ शकते. Samsung Galaxy S21 : सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला Samsung Galaxy S21 लाँच केला होता. भारतात या फोनची सुरुवातीची किंमत ५४,९९९ रुपये आहे. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, Galaxy S21 मध्ये ६.२ -इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये Android ११ आधारित One UI ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट आहे. याशिवाय यूजर्सना या हँडसेटमध्ये Exynos 2100 प्रोसेसर आणि ४,००० mAh बॅटरी मिळेल. कॅमेराबद्दल सांगायचे तर, Samsung Galaxy S21 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला लेन्स १२ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, दुसरा १२ MP आणि तिसरा ६४ MP टेलिफोटो लेन्स आहे. याशिवाय, डिव्हाइसच्या पुढील भागात सेल्फीसाठी १० MP कॅमेरा उपलब्ध असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GncgE2

Comments

clue frame