108MP कॅमेराचा Mi 11X Pro वर ९ हजारांचा डिस्काउंट, पाहा ऑफर आणि फीचर्स

नवी दिल्लीः Xiaomi India च्या अधिकृत वेबसाइटवर Mi Diwali Saleचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान, अनेक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे. या अंतर्गत तुम्ही एक प्रीमियम फोन खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी 5G च्या या फोनला ३९ हजार ९९९ रुपयांऐवजी ३० हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. Mi 11X Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स या स्मार्टफोनची किंमत ४७ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला ८ हजार रुपयाच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत ३९ हजार ९९९ रुपयात खरेदी केले जावू शकते. या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आहे. या व्हेरियंटवर ९ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर या फोनची किंमत ३० हजार ९९९ रुपये होते. यासोबतच २१ हजार ६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकते. Mi 11X Pro 5G के फीचर्स या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा HDR 10+ आणि MEMC टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. याचा पिक्सल रिझॉल्यूशन 2400x1080 आहे. MI 11X Pro: प्रोसेसर हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला आहे. सोबत ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. Mi 11X Pro: कॅमेरा या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सलचा आहे. दुसरा मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर दिला आहे. ५ मेगापिक्सलचा टेलिमायक्रो सेन्सर दिला आहे. फोनमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Mi 11X Pro: बॅटरी-OS फोनमध्ये ४५२० एमएएचची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोन MIUI 12 वर आधारित Android 11 काम करतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZnMy1j

Comments

clue frame