भन्नाट ! Xiaomi चे नवे इनोवेशन, घड्याळाच्या बेल्टने करता येणार पेमेंट, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : युजर्सची आवडती कंपनी Xiaomi एक भन्नाट डिव्हाइस आणण्याच्या तयारीत आहे. Xiaomi लवकरच एनएफसी सक्षम वॉच स्ट्रॅप लाँच करणार असून याच्या मदतीने युजर्सना संपर्क रहित पेमेंट करता येईल. सध्या, एनएफसी स्ट्रॅपबद्दल फार माहिती उपलब्ध नाही. कंपनीचे कार्यकारी रघु रेड्डी यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे की ते वॉच स्ट्रॅप फक्त वर काम करतील. वाचा: सदर लाँच आज ग्लोबल फिनटेक फेस्टिवल मध्ये पार पडला. डिव्हाइसला पावर देण्यासाठी, झिओमी वॉच स्ट्रॅप RuPay, RBL बँक आणि फिनटेक प्लॅटफॉर्म Zeta यांच्या भागीदारीत सादर केले गेले आहे. ही ऑफर सुरुवातीला काही विशिष्ट बँकांपुरती मर्यादित असू शकते. जी कालांतराने युजर्सच्या विस्तृत श्रेणीसाठी संपर्कविरहित पेमेंट सेवा देण्यासाठी विस्तारित केली जाईल. एका अहवालानुसार आरबीआय इनोव्हेशन हबचे सीईओ राजेश बन्सल यांनी म्हटले आहे की, भारतात यूपीआय पेमेंट्स २०२१ पर्यंत अंदाजे २.३ लाख कोटी रुपये असतील, परंतु २०२५ पर्यंत ते वाढून ६.२ लाख कोटी रुपये होतील. बन्सल यांनी कथितपणे सांगितले की, देशभरातील फक्त पाच लोकांपैकी एक सध्या डिजिटल पेमेंटचा सक्रियपणे वापर करीत आहे. बन्सल यांनी हे देखील अधोरेखित केले की भारताचा जीडीपी गुणोत्तर १४.१ टक्के आहे. संपर्क रहित पेमेंटसाठी Xiaomi एनएफसी वॉच स्ट्रॅप सारख्या उपकरणांसह, भारतातील अधिक वापरकर्ते ऑनलाइन आर्थिक सेवा स्वीकारण्यास सुरुवात करू शकतात. अद्याप देशात स्ट्रॅपची लाँचिंग तारीख किंवा किंमत याबद्दल माहिती उपलब्ध नाही. अशात, एनएफसी strap कोण- कोणत्या वॉचवर काम करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zP06Q3

Comments

clue frame