Xiaomi कडून दिवाळी सेलची घोषणा, स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टीव्हीवर मिळेल बंपर डिस्काउंट

नवी दिल्लीः शाओमीने आपल्या आगामी दिवाळी सेलची घोषणा केली आहे. यावर्षी शाओमी दिवाळी सेल घेवून येत आहे. या सेलमध्ये अनेक मोबाइल, टीव्ही आणि दुसऱ्या प्रोडक्ट्सला ऑफर मध्ये विकले जाणार आहे. यासंबंधीची माहिती कंपनीने ट्विटर वरून दिली आहे. शाओमीच्या दिवाळी सेल संबंधी तारीखची घोषणा करण्यात आली नाही. परंतु, लवकरच याच्या तारखेची घोषणा करण्यात येणार आहे. कंपनीने म्हटले की, DiwaliWithMi2021 यावर्षीची सर्वात मोठी पार्टी असेल. या सेलची माहिती शाओमी ग्लोबलचे व्हाइस प्रेसिडेंट आणि शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनू कुमार जैन यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून माहिती दिली आहे. जैन यांनी आपल्या ट्विट मध्ये DiwaliWithMi2021 या हॅशटॅगचा वापर केला आहे. या सेलमध्ये डिस्काउंट वर मिळणाऱ्या प्रोडक्ट्स संबंधी कोणतीही माहिती दिली गेली नाही. यासोबत देण्यात आलेल्या लिंकला ओपन केल्यानंतर दिवाळी सेल लवकरच येत असल्याचे लिहिलेले आहे. यात हेही म्हटले की, स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप्स आणि अन्य अॅक्सेसरीजवर एक्सक्लूसिव्ह धमाका ऑफर दिला जाणार आहे. या सेलसंबंधी म्हटले जात आहे की, हा सेल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. कंपनीने नुकतीच रेडमी स्मार्ट टीव्ही ३२ आणि स्मार्ट टीव्ही ४३ भारतात लाँच केले आहेत. रेडमी स्मार्ट टीव्ही ३२ ची किंमत भारतात १५ हजार ९९९ ठेवण्यात आली आहे. तर रेडमी स्मार्ट टीव्ही ४३ इंचाची किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२१ आणि दिवाळी विथ मी सेल मध्ये या टीव्हीची विक्री केली जाणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CDn2DD

Comments

clue frame