जबरदस्त फीचर्ससह Xiaomi TWS 3 Pro TWS Earbuds लाँच, मिळणार २७ तासांपर्यंत बॅटरी लाईफ, पाहा किंमत

नवी दिल्ली : Xiaomi ने ग्राहकांसाठी आपले नवीन 'True Wireless Stereo Earbuds' लाँच केले असून कंपनीचे हे बड्स अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचरसह येतात. सारख्या दिसणाऱ्या या बड्सना धूळ आणि पाणी प्रतिरोधनासाठी IP55 रेटिंग देण्यात आले आहे. पाहा डिटेल्स. वाचा: Xiaomi TWS Pro 3 : वैशिष्ट्ये LHDC ४.० कोडेकसह लाँच करण्यात आलेले हे जगातील पहिले TWS इयरबड्स असल्याचा दावा वेइबो पोस्टमध्ये, Xiaomi ने या नवीन बड्सबद्दल केला आहे. जे हाय-फाय ऑडिओसह ऐकण्याचा अनुभव सुधारतील. Xiaomi TWS Pro 3 : बॅटरी बॅटरीच्या लाईफ बद्दल सांगायचे तर, जेव्हा अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचर अक्षम केले जाते तेव्हा बड्स ६ तास बॅटरी लाईफ देतात आणि चार्जिंग केससह २७ तास बॅटरी लाईफ यात युजर्सना मिळत असून बड्सचे वजन ४..८ ग्रॅम आहे. बड्स अॅडॅप्टिव्ह एएनसी सपोर्टसह येतात, ज्यात मानवी आवाज वाढवण्याचा मोड, तीन-स्टेज आवाज कमी करण्याचे वैशिष्ट्य आणि एम्बियन्स मोड समाविष्टअसून हे लेटेस्ट बड्स यूएसबी टाइप-सी चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. Xiaomi TWS Pro 3 :किंमत Xiaomi TWS 3 Pro TWS Earbuds च्या किंमतीबद्दल बोलायचे तर, Buds ची किंमत CNY ६९९९ (सुमारे ८,००० रुपये) असून हे हिरव्या, काळ्या आणि पांढऱ्या रंगात लाँच करण्यात आले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iiuMDb

Comments

clue frame