Xiaomi 11 Lite NE 5G चे लॉंचिंग आज, ६४ MP कॅमेरा-३३ W फास्ट चार्जिंगसह काय असेल खास, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Xiaomi चा नवीन स्मार्टफोन- आज भारतात धडक देणार आहे. कंपनीचा हा सुपर लाईट फोन आज दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार असून लाँच इव्हेंट कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर युजर्सना लाईव्ह पाहता येईल. हा फोन काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या Xiaomi Mi 11 Lite 4G चे 5G व्हेरिएंट म्हणून भारतात दाखल होणार आहे. या फोनची जाडी फक्त ६.८१ मिमी आणि वजन १५८ ग्रॅम आहे. फोनची खास गोष्ट म्हणजे यात दिलेली 5G कनेक्टिव्हिटी ग्लोबल 5G बँडला सपोर्ट करते. वाचा: Xiaomi 11 Lite NE 5G ची वैशिष्ट्ये या फोनमध्ये २४०० x१०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५५-इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले पंच-होल डिझाइनचा आहे आणि हा HDR 10+ सपोर्टसह येतो. डिस्प्लेमध्ये, कंपनी ९० Hz च्या रिफ्रेश रेटसह २४० Hz चे टच सॅम्पलिंग दर देखील ऑफर करणार आहे. फोन तीन ८ GB रॅम आणि २५६ GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येईल. कंपनी फोनमध्ये १ टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट देखील चालवू शकते. प्रोसेसर म्हणून, या फोनला स्नॅपड्रॅगन 778 SoC चिपसेट Adreno 670 GPU सह देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप : फोटोग्राफीसाठी फोनला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. यात ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि ५-मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे. तसेच, फोनला अधिक पावरफुल बनविण्यासाठी यात ४२५० mAh ची बॅटरी देण्यात येईल. जी, ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज, 5G व्यतिरिक्त, या फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, ३.५ मिमी हेडफोन जॅक, आयआर ब्लास्टर, वाय-फाय ६ , ब्लूटूथ ५.२ आणि कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-फ्रिक्वेन्सी जीपीएससारखे पर्याय आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EZ6yrt

Comments

clue frame