नवी दिल्ली: ज्याची युजर्स आतुरतेने वाट पाहत होते तो भारतीय बाजारात लाँच करण्यात आला असून या फोनला १० बिट पॉलिमर OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आणि ३३ W फास्ट चार्जिंगसारखी फीचर्स असून फोनची किंमत २६,९९९ रुपयांपासून सुरू होते. जाणून घ्या Xiaomi 11 Lite 5G NE ची सेल डेट. वाचा: Xiaomi 11 Lite 5G NE किंमत आणि सेल डेट : फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २६,९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २८,९९९ रुपये असून हे डिव्हाइस डायमंड डॅझल, टस्कनी कोरल, विनाइल ब्लॅक आणि जाझ ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com, ई-कॉमर्स वेबसाइट Amazon.in, १०,००० + रिटेल स्टोअर्ससह कंपनीच्या इतर Mi Home स्टोअर्स वर २ ऑक्टोबर मध्यरात्री १२ वाजतापासून फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. ऑफर्स बद्दल बोलायचे तर, शाओमी ने दिवाळी ऑफर सादर केली आहे ज्याअंतर्गत २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत १,५०० रुपयांपर्यंत सूट दिली जाईल, त्यानंतर या फोनची किंमत अनुक्रमे २५,४९९ आणि २७,४९९ रुपयांवर येईल. याशिवाय, २,००० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर देखील दिल्या जातील. Xiaomi 11 Lite 5G NE ची वैशिष्ट्ये: हे डिव्हाइस अँड्रॉइड ११ वर आधारित MIUI १२.५ वर काम करते. यात ६.५५ इंच फुल HD+ डिस्प्ले आहे.ज्याचे, पिक्सेल रिझोल्यूशन १०८०x२४०० आहे. यात ९० Hz रिफ्रेश रेट, २४० Hz टच सॅम्पलिंग रेट, HDR १०+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला असून त्याचा प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सेलचा आहे. ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा टेलि-मॅक्रो सेन्सर देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा सेन्सर आहे. Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये ४२५० mAh ची बॅटरी आहे. जी, ३३ W फास्ट चार्जिंगसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, 5G (12 बँड सपोर्ट), 4G LTE, वाय-फाय ६ ब्लूटूथ v5.2, GPS / A-GPS, NFC, IR ब्लास्टर आणि USB टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली असून फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3B4ylUM
Comments
Post a Comment