WhatsApp यूजर्स नापसंत व्यक्तीपासून लपवू शकतील लास्ट सीन आणि स्टेट्स

नवी दिल्लीः यूजर्सचा एक्सपीरियन्स आणखी चांगला करण्यासाठी खूप सारे नवीन फीचर्स वर कंपनी सध्या काम करीत आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्सनुसार, WhatsApp काही अशा फीचर्सची टेस्टिंग करीत आहे. ज्यात युजर्संना आपले स्टेट्स, लास्ट सीन, आणि प्रोफाइल फोटो काही सिलेक्टेड लोकांपासून लपवू शकतील. काही दिवसांपूर्वी व्हाट्सअॅपला आयओएस बीटा अॅपवर फीचरची टेस्टिंग करताना पाहिले गेले होते. आता व्हाट्सअॅपच्या अँड्रॉयड व्हर्जन वर या फीचरची टेस्टिंग करताना पाहिले गेले होते. Wabetainfo च्या माहितीनुसार, व्हाट्सअॅप युजर्स आता निवडक कॉन्टॅक्ट्समधून लास्ट सीन, स्टेट्स, प्रोफाइल पिक्चर आणि खूप काही लपवण्यासाठी हे फीचर आणण्यासाठी कंपनी योजना बनवत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, व्हाट्सअॅप लास्ट सीन, प्रोफाइल पिक्चर, अबाउट साठी एक नवीन माय कॉन्टॅक्टला सोडून एक अॅडिशनल ऑप्शन जोडण्याची योजना बनवत आहे. कोणत्याही व्यक्तीपासून तुम्ही तुमची पर्सनल डिटेल्स लपवू शकता. व्हाट्सअॅप फीचर ट्रॅकरने एक स्क्रीनशॉट शेयर केले आहे. हे फीचर रोलआउट केल्यानंतर कसे दिसेल. स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही Everyone, My contacts, My contacts except, Nobody सारखे चार ऑप्शन तुम्हाला दिसेल. तुम्ही कोणत्याही नको असलेल्या व्यक्तीला अपडेट शेयर करू इच्छित नसेल तर तुम्ही contact except option निवडू शकता. यानंतर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट्स वरून लास्ट सीन, प्रोफाइल पिक्चर आणि बाकी सर्व काही लपवण्याचा पर्याय मिळेल. परंतु, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही आपले लास्ट सीन कुणापासून लपवत असाल तर तुम्ही सुद्धा त्यांचे लास्ट सीन पाहू शकत नाही. व्हाट्सअॅप आपल्या आयओएस आणि अँड्रॉयड अॅप वर या फीचरची टेस्टिंग करीत आहे. कंपनीकडून अजून या फीचर संबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zPlKn9

Comments

clue frame