नवी दिल्लीः जगभरात सर्वात जास्त वापरला जाणारे इंस्टेंट मेसेजिंग अॅप चे २ अब्जहून जास्त युजर्स आहेत. अनेक युजर्स वर्षानुवर्षे व्हाट्सअॅपचा वापर करीत आहेत. परंतु, हे अॅप काही स्मार्टफोन्सवर बंद होणार आहे. कंपनी जुन्या अँड्रॉयड फोन्सवरून व्हाट्सअॅप सपोर्ट काढणार आहे. व्हाट्सअॅप खूप साऱ्या अँड्रॉयड व्हर्जनला सपोर्ट करतात. परंतु, आता कंपनी अँड्रॉयडचे कमीत कमी व्हर्जन वाढवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत कमीत कमी अँड्रॉयड ४.० (कोडनेम आयस्क्रीम सँडविच) व्हर्जनवर चालवले जात होते. परंतु, आता कंपनीने आपली वेबसाइटला अपडेट केले आहे. ज्यात व्हाट्सअॅप आता कमीत कमी अँड्रॉयड ४.१ व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉयड फोन्सला सपोर्ट करणार आहे. व्हाट्सअॅपने याची डेडलाइन १ नोव्हेंबर ठेवली आहे. म्हणजेच या तारखेनंतर या जुन्या स्मार्टफोनवर युजर्स व्हाट्सअॅपचा वापर करू शकणार नाही. काय म्हटले कंपनीने अधिकृत व्हाट्सअॅप सपोर्ट पेजवर कंपनीने म्हटले की, सध्या अँड्रॉयड ४.१ आणि त्यापेक्षा नवीन व्हर्जनला सपोर्ट करणार आहे. याचाच अर्थ व्हाट्सअॅप अशा अँड्रॉयड फोन्सवर काम करतो. जे २०१३ च्या नंतर जारी करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे जुने स्मार्टफोन्स आहेत. त्यांना नोव्हेंबर नंतर अपडेट करण्यात येणार नाहीत. व्हाट्सअॅप असे करणारा एकमेव डेव्हलपर नाही. अनेक डेव्हलपर्स अँड्रॉयडच्या जुन्या व्हर्जनचा सपोर्ट काढत असतात. जुन्या फोन युजर्संनी काय करावे जर तुमच्याकडे २०१३ किंवा यानंतरचा कोणताही जुना फोन असेल तर चिंता करण्याची गरज नाही. परंतु, तुमच्याकडे LG Optimus L3, Samsung Galaxy SII, Galaxy Core, ZTE Grand S Flex आणि Huawei Ascend G740 सारखे जुने फोन असतील तर त्यात व्हाट्सअॅप चालणार नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हाट्सअॅप आता १ नोव्हेंबर २०२१ पासून ओएस ४.०.४ आणि जुन्या ओएसवर चालणाऱ्या अँड्रॉयड फोनचा सपोर्ट करणार नाही. तुम्ही कोणत्याही नवीन डिव्हाइसवर स्विच करू शकता किंवा आपली चॅट हिस्ट्रीला सेव्ह करू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lW47x4
Comments
Post a Comment