६०W फास्ट चार्जिंग आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह लाँच झाला Oppo K९ Pro स्मार्टफोन, पाहा वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : ने आपल्या के९ स्मार्टफोनचे अपग्रेडेट व्हर्जन ला लाँच केले आहे. फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर यात रियर ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन आणि ड्यूल स्टीरियो स्पीकर्स दिले आहेत. च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Oppo K9 Pro चे स्पेसिफिकेशन्स सॉफ्टवेअर: हा फोन अँड्राइड ११ आधारित कलर ओएस ११.३ वर काम करतो. डिस्प्ले: ड्यूल नॅनो सिम सपोर्टसह येणाऱ्या या फोनमध्ये ६.४३ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज, स्क्रीन टू बॉडी रेशियो ९१.७ टक्के आणि पिक्सल डेंसिटी ४०९ पिक्सल प्रती इंच आहे. प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात MediaTek Dimensity १२०० SoC सह १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. बॅटरी: यात ६० वॉट सुपर फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह येणारी ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन ५.२, ५जी, यूएसबी टाइप-सी, वाय-फाय ८०२.११ एसी, एनएफसी सारखे फीचर्स दिले आहे. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. डिव्हाइसमध्ये स्टीरियो ड्यूल स्पीकर्स दिले आहेत. कॅमेरा: फोनमध्ये बॅक पॅनेलवर ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, सोबत ८ मेगापिक्सल सुपर वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Oppo K9 Pro ची किंमत फोन Obsidian Warrior आणि Glacier Overture रंगात येतो. याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,१९९ CNY (जवळपास २५,१०० रुपये), १२ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेजची किंमत २,६९९ CNY (जवळपास ३०,८०० रुपये) आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AGJ4om

Comments

clue frame