Vodafone-Idea च्या ‘या’ प्लॅनने जिओला टाकले मागे, अनलिमिटेड डेटासह मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असले तरी कंपनी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन्स आणत आहे. वोडाफोन आयडियाकडे एक असा प्लॅन आहे, ज्याच्यासमोर एअरटेल आणि जिओचे प्लॅन देखील फेल होतात. वोडाफोन आयडियाच्या या प्लॅनची किंमत ५५५ रुपये आहे. वाचा: Vodafone-Idea चा ५५५ रुपयांचा प्लॅन या प्लॅनची वैधता ७७ दिवस आहे. यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओवर सुविधा आणि अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. चा ५५५ रुपयांचा प्लॅन या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, JioNews, JioCloud, JioSecurity सारख्या जिओ अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. या प्लॅनची वैधता ८४ दिवस आहे. कोणाचा प्लॅन चांगला? दोन पॅकमधील सर्वात मोठा फरक वीकेंड डेटा रोलओवरचा आहे. वोडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये शनिवार-रविवारी बाकी राहिलेला डेटा वापरता येतो. याशिवाय रात्री १२ ते ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरता येतो. जास्त वैधतेसह येणारा प्लॅन हवा असणाऱ्या यूजर्ससाठी रिलायन्स जिओचा प्लॅन फायद्याचा ठरू शकतो. वीआय रोलओवर डेटाची सुविधा देत आहे. परंतु, त्याची वैधता ७७ दिवस आहे. तर जिओच्या प्लॅनची वैधता ८४ दिवस आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XY6B6h

Comments

clue frame