नवी दिल्ली : Vivo X70 मालिकेचे दोन जबरदस्त स्मार्टफोन आज दुपारी १२ वाजता भारतात लाँच होणार असून हे स्मार्टफोन Vivo X70Pro आणि Plus आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार या स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना उत्तम कॅमेरा अनुभव मिळेल. स्नॅपड्रॅगन ८८८+ 5G सह येणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. वाचा: Vivo X70 Series: वैशिष्ट्ये Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये अमोलेड डिस्प्ले दिला जाईल, जो WQHD + सपोर्टसह येईल. फोन १२०Hz रिफ्रेश रेटसह ऑफर केला जाईल. फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले, ड्युअल 5G सिम तसेच ड्युअल स्पीकर सपोर्ट दिला जाईल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ५० MP अल्ट्रा फोटोसेन्सिटिव्ह सेन्सर, ४८ MP अल्ट्रा वाइड गिंबल सेन्सर आणि १२MP IMX६६३ कॅमेरा आणि ८ MP लेन्स आहेत. यात सुपर मून, सुपर नाईट मोडसह फोनमध्ये विविध मोड देण्यात आले आहेत. याशिवाय फोनमध्ये ६० x चा झूम देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Vivo X70 Pro plus स्मार्टफोनमध्ये ४५०० mAh बॅटरी दिली जाईल, जी ५५ W फ्लॅश चार्जरच्या मदतीने चार्ज करण्यात सक्षम असेल. तसेच, ५० W वायरलेस फ्लॅश चार्जरचा सपोर्ट देखील यात असेल. Vivo X70 Pro Plus स्मार्टफोन IP68 रेटिंगसह लाँच करण्यात येणार असून Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये गिम्बर स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञान वापरले गेले आहे. तसेच, प्लास्टिकच्या ऐवजी काचेच्या लेन्सचा वापर करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kPd9fX
Comments
Post a Comment