नवी दिल्ली : ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, हेडफोन, इयरफोन, इअरबड्स आणि इतर अनेक श्रेणींमधील उत्पादनांवर प्रचंड सूट देण्यात येणार आहे. नेहमीच्या सवलती व्यतिरिक्त, अमेझॉन काही बँक खातेधारकांना बँक सवलत देखील देत आहे. वाचा : जर तुम्ही Active Noise Cancellation सह चांगले इयरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अमेझॉनवर उपलब्ध असलेले काही पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरतील. या सेलमध्ये तुम्ही Sony सारख्या प्रीमियम बड्स देखील खरेदी करू शकता, परंतु जर तुम्हाला तेवढा खर्च करायचा नसेल, तर तुम्ही boAt, नॉईज आणि इतर बऱ्याच स्वस्त पर्यायांसाठीही जाऊ शकता. पाहा डिटेल्स. Sony WF-1000XM3 TWS इयरबड्स : Sony WF-1000XM3 प्रीमियम TWS इयरबड्स १९,९९० रुपयांमध्ये लाँच करण्यात आले. विक्रीमध्ये तुम्ही हे बड्स १४,९९० रुपयांना खरेदी करू शकता. सोनी WF-1000XM3 ड्युअल नॉईज सेन्सर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. जे, आवाज पकडण्यासाठी आणि रद्द करण्यासाठी नवीन HD QN1e प्रोसेसरसह काम करते. कंपनीचा दावा आहे की, इयरफोन ६ तासांपर्यंत टिकतात आणि चार्जिंग केस २४ तास बॅटरी लाईफ देते. आवाज रद्द मोड बंद असल्यास, डिव्हाइस ३२ तासांपर्यंत पॉवर देते यात क्विक-चार्ज फीचर देखील आहे आणि चार्जिंग केसमध्ये १० मिनिटांचे क्विक चार्ज फंक्शन आहे जे ९० मिनिटांचा प्लेटाइम प्रदान करते. Realme Buds Q2 Active Noise Cancelation : Realme Buds Q2 हा अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनसह येणारा सर्वात परवडणारा इयरबड आहे. अॅमेझॉन सेलमध्ये ऑडिओ डिव्हाइसची किंमत २४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हे ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्येही उपलब्ध आहे. इयरबड्स १० मिमी बास बूस्ट ड्रायव्हर आणि मोठ्या लिक्विड क्रिस्टल पॉलिमर डायाफ्रामसह बास बूस्ट+ अल्गोरिदमसह सुसज्ज आहेत. बॅटरीच्या बाबतीत, कंपनीचा दावा आहे की इयरबड्स २८ तासांची बॅटरी लाईफ देतात. हे वेगवान चार्जिंगला देखील समर्थन देते जे फक्त १० मिनिटांच्या चार्जिंग वेळेसह ३ तास बॅटरी लाईफ देते. Huawei FreeBuds 3i : Huawei FreeBuds 3i बड्स Amazon वर ५९७६ रुपयांना विकल्या जात आहेत. यावर कूपन देखील लागू करू शकता आणि डिव्हाइसवर ५०० रुपयांची फ्लॅट सूट मिळवू शकता. इअरबड्स मोठ्या १० mm डायनॅमिक ड्रायव्हर्ससह सुसज्ज आहेत जे शक्तिशाली बास वितरीत करतात. बड्स स्वतःच्या IPX4 वॉटर-रेझिस्टंट तंत्रज्ञानासह देखील येते. boAt Airdopes 501 ANC : अॅमेझॉनवर boAt Airdopes 501 ANC Truly Wireless ची किंमत ३२४० रुपये आहे. इयरबड्स कॅरींग केससह एकूण २८ तास प्लेबॅक देतात. हे फास्ट चार्जिंग सपोर्टसह देखील येते, जे चार्जिंगच्या फक्त ५ मिनिटांमध्ये ६० मिनिटांचा प्लेबॅक वेळ प्रदान करते. वाचा: ' वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uxMuYj
Comments
Post a Comment