मस्तच! भारतात लाँच झाला Samsung Galaxy F४२ ५G स्मार्टफोन, मिळणार ३ हजार रुपये स्पशेल डिस्काउंट

नवी दिल्ली : ने भारतात आपला नवीन लाँच केला आहे. कंपनीने एफ सीरिजमधील पहिला ५जी स्मार्टफोन ला सादर केले आहे. फोनमध्ये नाइट मोडसह ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. फोन १२ बँड ५जी सपोर्ट करतो. फोनला मॅट ब्लॅक आणि मॅट एक्वा या २ रंगात सादर केले आहे. वाचा: Samsung Galaxy F42 5G ची किंमत या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. फोनला , ऑनलाइन स्टोर आणि ठराविक रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकता. ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्टच्या सेल मध्ये फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटला १७,९९९ रुपये स्पेशल इंट्रोडक्टरी किंमतीत खरेदी करता येईल. तर ८ जीबी रॅम व्हेरिएंटला १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच, फ्लिपकार्ट सेलमध्ये फोन ३ हजार रुपयांनी स्वस्त मिळेल. ही लिमिटेड पीरियड ऑफर आहे. Samsung Galaxy F42 5G चे स्पेसिफिकेशन्स Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर दिला आहे. पॉवरसाठी १५ वॉट यूएसबी टाइप सी फास्ट चार्जर सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा ५जी स्मार्टफोन १२ बँड्स सपोर्ट करतो. मिळेल ६४ मेगापिक्सल कॅमेरा फोनमध्ये ६४ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात नाइट मोड मिळेल. रियरला ५ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्राइड ११ आधारित One UI ३.१ वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AYZKYA

Comments

clue frame