Reliance Jio या प्लान्सवर देत आहे कॅशबॅक ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ आपल्या प्रीपेड प्लानमध्ये पुन्हा एकदा बदल करीत आहे. फेस्टिव सीजन आधी रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लान्समध्ये बदल करण्यात आले आहे. या बदला सोबत रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी बेस्ट सेलिंग प्रीपेड प्लान आणि अफोर्डेबल करण्याचा प्रयत्न करीत आहे. या चेंजला वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आले आहे. युजर्संना अनेक प्लान्स सोबत कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर संपण्याआधी तुम्ही त्याचा फायदा घेवू शकता. या ठिकाणी २४९ रुपये, ५५५ रुपये, ५९९ रुपयांच्या प्लान्स संबंधी आम्ही ही माहिती तुमच्यासाठी देत आहोत. रिलायन्स जिओने या प्लान्स सोबत युजर्संना कॅशबॅक देत आहे. कंपनी या प्लान्स सोबत २० टक्के कॅशबॅक देत आहे. ही कॅशबॅक जिओच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटवरून रिचार्ज केल्यानंतर मिळणार आहे. रिलायन्स जिओचा २४९ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. जिओच्या ५५५ रुपयाच्या आणि ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते. ५५५ रुपयाच्या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा दिला जातो. तर ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये २ जीबी डेटा दिला जातो. या सर्व प्लान्स मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्स जसे जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3odtf53

Comments

clue frame