Redmi Note 10 Pro Max स्वस्तात खरेदीची संधी, दमदार बॅटरीसोबत १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा

नवी दिल्लीः Discount on Offers: तुम्ही जर २० हजार रुपयांपर्यंत एक नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. Xiaomi चा सब-ब्रँड Redmi चा 108MP कॅमेरा सेन्सरचा रेडमी नोट १० प्रो मॅक्स स्मार्टफोन अनेक ऑफर्स सोबत मिळत आहे. या फोनच्या फीचर्स मध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा सह दमदार बॅटरी मिळते. तसेच पॉवरफुल प्रोसेसर मिळते. जाणून घ्या या फोनची फीचर्स आणि डिस्काउंट ऑफर्स संबंधी. फोनची स्पेसिफिकेशन्स या फोनमध्ये २.३ गीगाहर्ट्ज क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी चिपसेट सोबत ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड स्क्रीन दिली आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. या फोनच्या बॅक पॅनेलवर फोटोग्राफीसाठी १०८ मेगापिक्सल सोबत ८ मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5020mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. फोनची किंमत ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. फोनवर ही ऑफर्स काही शानदार ऑफर्स हँडसेट सोबत लिस्ट आहेत. यात HDFC बँक क्रेडिट कार्ड व ईझी ईएमआयच्या ट्रान्झॅक्शनद्वारे खरेदी केल्यास १५०० रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंटचा फायदा मिळतो. जुना फोन खरेदी केल्यास मी एक्सचेंज ऑफर द्वारे १७ हजार ५०० रुपयांपर्यंत बचत करता येवू शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EW62dF

Comments

clue frame