नवी दिल्लीः स्मार्टफ़ोन मेकर कंपनी Redmi ने अधिकृत पणे भारतात आपला स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये काही खास नवीन देण्यात आले नाही. हा फोन जुन्या Redmi Note 9 Pro स्मार्टफोन चा रिबेज आहे. ज्यात काही खास बदल करण्यात आले नाही. परंतु, फोनची स्टायलिश लूक आणि फीचर्स पाहून तुम्ही याला खरेदी करण्याची इच्छा होईल. Redmi Note 10 Lite ची किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटच्या या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. 6GB RAM + 128GB च्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला कंपनीने तीन कलर व्हेरियंट मध्ये आणले आहे. जे मिडनाइट ब्लॅक, मॅटेलिक ग्रे आणि ग्लेशियर व्हाइट आहे. या स्मार्टफोनची विक्री भारतात २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरू केली जाणार आहे. Redmi Note 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स रेडमी नोट १० लाइटचे एक्सटीरियर जुन्या Redmi Note 9 Pro सारखेच आहे. यात फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत ६.६७ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. यात कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. यात पंच होल कट आउट मध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या मागे क्वॉड कॅमेरा सिस्टम आहे. यात 48MP चा मेन कॅमेरा लेन्स, 8MP चा वाइड अँगल लेन्स, 5MP चा लेन्स आणि शेवटी 2MP चा सेन्सर दिला आहे. सुरक्षेसाठी या डिव्हाइस मध्ये साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G SoC कडून संचालित आहे. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिले आहे. यात ऑडियोसाठी ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे. वाचाः वाचाः वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3op4OBJ
Comments
Post a Comment