१ ऑक्टोबरपासून बदलतोय ऑटो पेमेंट नियम, जाणून घ्या RBI चा नवीन नियम

नवी दिल्ली: जर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म किंवा नेटफ्लिक्स, प्राइम, हॉटस्टार सारखी डीटीएच सेवा वापरत असाल, तर तुमच्यासाठी आरबीआयचा नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण, १ ऑक्टोबर नंतर अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स आणि डीटीएच रिचार्ज काम करणे थांबवू शकतात. याचे कारण रिचार्ज न करणे असू शकते. सध्या, बरेच लोक नेटफ्लिक्स, Amazon प्राइम किंवा डीटीएच रिचार्जसाठी क्रेडिट कार्ड पेमेंट, यूपीआय पेमेंटसह ऑटो पेमेंट सेवा वापरतात. म्हणूनच यासाठीऑटो डेबिट पेमेंटच्या नियमांमधील बदल जाणून घेणे आवश्यक आहे. वाचा: १ ऑक्टोबरपासून ऑटो पेमेंटचे नियम बदलत आहेत १ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आदेशामुळे ऑटो पेमेंट सेवा बंद केली जात आहे. आरबीआयने अशी पेमेंट करण्यासाठी अतिरिक्त एएफए अर्थात अॅडिशन फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया जोडली आहे. अशा परिस्थितीत, ऑटो पेमेंट सेवा वापरणाऱ्यांनी नवीन नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. अन्यथा, तुमचा रिचार्ज चुकणार आणि OTT प्लॅटफॉर्म काम करणे बंद करतील. १ ऑक्टोबर २०२१ पासून चे नवीन नियम देशभरात लागू केले जाणार आहे. अतिरिक्त घटक प्रमाणीकरण काय आहे (AFA) RBI च्या आदेशानंतर ऑटो पेमेंटमध्ये अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशन जोडले गेले आहे. याचा अर्थ, ऑटो पेमेंट करण्यापूर्वी, तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म आणि बँकेद्वारे ऑटो पेमेंटबद्दल माहिती दिली जाईल. जर तुम्हाला रिचार्ज चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला ऑटो पेमेंटला परवानगी द्यावी लागेल. आत्तापर्यंत ऑटो पेमेंटपूर्वी मेसेज येत नव्हता. AFA नियम १ एप्रिल २०२१ पासून लागू करण्यात येणार होते. पण, नंतर RBI ने त्यावर ६ महिन्यांची सूट दिली. पण,आता मात्र ऑटो पेमेंट एएफए नियम १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Wm62lM

Comments

clue frame