नवी दिल्ली: Poco C31 ३० सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. परंतु, लाँचच्या आधीच , कंपनीने स्मार्टफोनच्या काही विशिष्ट वैशिष्ट्यांची टीझ केले आहे. कंपनीच्या इंडिया वेबसाइटच्या लँडिंग पेजवर च्या रॅम, आकार आणि प्रोसेसरबद्दल माहिती कन्फर्म करण्यात आली आहे. Poco C31 फ्लिपकार्ट द्वारे खरेदीसाठी उपलब्ध होईल आणि ३ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या बिग बिलियन डेज सेल २०२१ मध्ये विक्रीसाठीहि उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. तसेच, नवीन POCO स्मार्टफोन गेल्या वर्षी भारतात लाँच झालेल्या स्मार्टफोनचे अपडेटेड मॉडेल असण्याची शक्यता आहे. वाचा: Poco C31 ची संभाव्य वैशिष्ट्ये : कंपनीच्या वेबसाइटने लाँच होण्यापूर्वी Poco C 31 ची काही वैशिष्ट्ये दर्शविली आहेत. जे कन्फर्म करते की, Poco C 31 हुड अंतर्गत मीडियाटेक हेलियो G35 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. तसेच, ४GB रॅमसह येण्याची पुष्टी केली आहे. Poco C3 देखील मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये MediaTek Helio G35 SoC सह लाँच करण्यात आला होता, जो ४ GB पर्यंत RAM सह जोडला गेला होता. Poco C31 फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरसह येईल. Poco ने C31 लँडिंग पेजवर दावा केला आहे की, नवीन स्मार्टफोनची लाईफ बाजार मानकांपेक्षा २५ टक्के जास्त असेल. कंपनीने म्हटले आहे की, Poco C 31 "दैनंदिन वापराच्या २.५ वर्षांनंतरही चांगले राहील".Poco C 31 मध्ये डिस्प्लेवर वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच असेल, ज्यामध्ये सडपातळ बेझल आणि जाड तळाशी बेझल असेल. नवीन हँडसेटमध्ये निळ्या रंगाचा पर्याय असेल. मात्र, फोनचा कॅमेरा, किंमत आणि डिस्प्लेबाबत इतर स्पेसिफिकेशन्स अद्याप शेअर करण्यात आलेले नाहीत. नवीन Poco C31 ही अद्ययावत आवृत्ती असण्याची अपेक्षा आहे. Poco C3 मध्ये ६.५३ -इंच HD+ (७२० x१६०० पिक्सेल) LCD वॉटरड्रॉप नॉचसह आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात, १३ एमपी मुख्य स्नॅपर, २ एमपी मॅक्रो सेन्सर आणि २ एमपी डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी ५ एमपी कॅमेरा आहे. Poco C3 ६४ GB ऑनबोर्ड स्टोरेज ऑफर करतो. जे, मायक्रोएसडी कार्डद्वारे (५१२ GB पर्यंत) वाढवता येते. यात १० m फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली ५००० mAh ची बॅटरी आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3F48IpR
Comments
Post a Comment