Oppo Reno 6 Pro, Oppo F19s आणि Enco Buds च्या स्पेशल एडिशनचे लाँचिंग आज, 'येथे' पाहा लाईव्ह इव्हेन्ट
नवी दिल्ली: OPPO तर्फे आज एक व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यात 5G चे दिवाळी एडिशन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. तसेच, स्पेशल एडिशन आणि Oppo Blue देखील यावेळी सादर केले जातील. ओप्पोचा हा व्हर्च्युअल कार्यक्रम आज, म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुरू होणार असून युजर्स कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हा कार्यक्रम थेट पाहू शकतील. यासह, हा कार्यक्रम कंपनीच्या सोशल मीडियावर देखील लाइव्ह होईल. वाचा: Oppo Reno6 Pro 5G दिवाळी एडिशनची वैशिष्ट्ये : Oppo Reno6 Pro 5G दिवाळी एडिशन स्मार्टफोन 'मॅजेस्टिक गोल्ड' कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात बोकेह फ्लेअर पोर्ट्रेट व्हिडिओ मोड, एआय हायलाइट व्हिडिओ आणि रेनो ग्लोसह सर्व प्रकारची वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. फोन MediaTek Dimensity १,२०० चिपसेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये ६५ W SuperVOOC फ्लॅश चार्जिंग दिले जाईल. तर, फोन ColorOS ११.३ वर काम करेल. Oppo F19s स्मार्टफोनची वैशिष्ट्ये : Oppo F19s स्मार्टफोन ५,००० mAh च्या मजबूत बॅटरी सपोर्टसह येऊ शकतो. फोन ३३ W फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानासह सादर केला जाईल. Oppo F19s स्पेशल एडिशनमध्ये नवीन AG डिझाईन देण्यात आले आहे. जे स्मूथ फिंगरप्रिंट प्रतिरोधक पृष्ठभाग प्रदान करेल. Oppo Enco Buds ची वैशिष्ट्ये : Oppo Enco Buds ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून यात २४ तासांची मजबूत बॅटरी लाईफ असेल. तसेच हे डिव्हाइस आवाज रद्द करण्याच्या तंत्रज्ञानासह येईल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XToJ0I
Comments
Post a Comment