OPPO A55 च्या लाँचिंगआधीच फीचर्स लीक, फेस अनलॉकसह हे फीचर्स मिळणार

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी ओप्पो (OPPO) उद्या म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी आपला नवीन हँडसेट ओप्पो ए55 () भारतात लाँच करणार आहे. या आगामी स्मार्टफोनची मायक्रोसाइट अमेझॉन इंडिया Amazon India वर लाइव्ह करण्यात आली आहे. यावरून याची डिझाइन आणि फीचरची माहिती मिळाली आहे. मायक्रोसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, OPPO A55 स्मार्टफोन मध्ये ६.५१ इंचाचा पंच होल डिस्प्ले सोबत येईल. यात Eye प्रोटेक्शन फीचर मिळेल. सोबत यात सुरक्षासाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉकची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. शानदार फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या रियर मध्ये एलईडी फ्लॅश लाइट सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. यात पहिला 50MP चा मेन लेन्स, दुसरा 2MP चा मायक्रो लेन्स आणि तिसरा 2MP चा डेप्थ सेन्सर उपलब्ध होणार आहे. बॅटरी आणि कनेक्टिविटी ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जावू शकते. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये वाय फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट सोबत १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी मिळू शकते. हा स्मार्टफोन अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. OPPO A55 ची संभावित किंमत ओप्पोने अजूनपर्यंत OPPO A55 ची किंमत किंवा फीचरवरून कोणतेही संकेत दिले नाही. परंतु, लिक्स झालेल्या माहितीनुसार, या फोनची किंमत १५ हजार रुपयाच्या जवळपास असू शकते. परंतु, याची खरी किंमत लाँचिंगच्या इव्हेंटनंतर स्पष्ट होईल. ओप्पोने नुकतेच रेनो 6 प्रो 5G दिवाळी एडिशन (Reno 6 Pro 5G Diwali Edition) ला लाँच केले होते. या स्मार्टफोनची किंमत ४१ हजार ९९० रुपये आहे. याची विक्री ६ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. याचे फीचर ओप्पो रेनो 6 प्रो (OPPO Reno 6 Pro) सारखेच आहेत. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kQNfIO

Comments

clue frame