Nothing Ear 1 वर पहिल्यांदाच मिळणार 'इतकी' सूट, डिव्हाइसचे फीचर्सही जबरदस्त, पाहा किंमत

नवी दिल्ली : जगातील सर्वात हटके इयरबड्स पहिल्यांदाच सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून फ्लिपकार्टच्या आगामी बिग बिलियन डेज सेलमध्ये तुम्हाला ५०० रुपयांच्या सूटसह Nothing Ear 1 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. बिग बिलियन डेज सेल ३ ऑक्टोबरपासून सुरू होत असून ग्राहकांना १० ऑक्टोबरपर्यंत याचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे, Nothing Ear 1 हे वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पेई या नवीन कंपनी नथिंगचे पहिले उत्पादन आहे. वाचा: या फ्लिपकार्ट सेलमध्ये Nothing Ear 1 ५, ४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे भारतीय बाजारात ५,९९९ रुपयांना लाँच करण्यात आले होते. २ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हे इयरबड स्वस्तात खरेदी करता येतील. यासह, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेकडून ऑफर देखील उपलब्ध आहेत. तसेच, नो कॉस्ट ईएमआय वर देखील तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करू शकता. Nothing Ear 1 ची वैशिष्ट्ये : Nothing Ear 1 पारदर्शक केससह येत असून हे बड्स देखील पारदर्शक आहेत. Nothing Ear 1 अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनसह येतात , जे दोन भिन्न स्तर ऑफर करते. यात एक पारदर्शकता मोड देखील आहे जो सराउंड साऊंडमध्ये मदत करतो. Nothing Ear 1 ची बॅटरी ५.७ तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. तर, चार्जिंग केससह बॅटरी लाईफ ३४ तास असेल. हे डिव्हाइस चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी चे समर्थन करते. १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ८ तासांचा बॅकअप असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. Nothing Ear 1 मध्ये ११.६ मिमीचा डायनॅमिक ड्रायव्हर असून हे स्वीडनच्या टीनेज अभियांत्रिकीच्या मदतीने डिझाइन आणि विकसित करण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात एसबीसी आणि एएसी ब्लूटूथ कोडेक्सच्या समर्थनासह ब्लूटूथ ५.२ आहे. नियंत्रणासाठी त्यात टच जेश्चर देण्यात आले आहे. हे इयरबड्स इयर 1 अॅपवरून देखील नियंत्रित केले जाऊ शकतात. जे, Android आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oeQzj5

Comments

clue frame