लाँचच्या आधीच Nokia G300 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक, फीचर्सबद्दल झाला 'हा' खुलासा

नवी दिल्ली : Nokia G50 च्या लाँच नंतर Nokia परवानाधारक HMD ग्लोबल लवकरच फोन लाँच करणार आहे. हा कंपनीचा पुढील परवडणारा स्मार्टफोन असेल. परंतु, लाँचच्या आधीच एका लीकमध्ये Nokia G300 5G चे फोटोज आणि मुख्य वैशिष्ट्ये समोर आली आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसर असल्याचेही सांगितले जात आहे. वाचा: लीक झालेले काही डिटेल्स Nokia G50 स्मार्टफोनशी जुळतात, ज्यात स्नॅपड्रॅगन 480 SOC होता. Nokia G300 5G मध्ये १६ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ४,४७० mAh बॅटरीसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असल्याचीही अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. Nokia G300 ची संभाव्य वैशिष्ट्ये: Nokia G300 ची छायाचित्रे आणि वैशिष्ट्ये Nokia poweruser वेबसाइटवर लीक झाली असून त्यात नोकिया स्मार्टफोनमध्ये ७२० × १,६०० पिक्सेल रिझोल्यूशन असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ११ वर करेल आणि स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसरने परिपूर्ण असेल . तसेच, यात ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात येईल जे मायक्रोएसडी कार्डद्वारे १TB पर्यंत वाढवता येईल. लीकनुसार, Nokia G 300 मध्ये १६ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. सेल्फीसाठी, स्मार्टफोन समोर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. सोबतच, हँडसेटमध्ये ३०fps वर १०८० p व्हिडिओ रेकॉर्डिंग रिझोल्यूशन आहे. नोकिया G300 T3/M3 च्या Hearing Aid Compatible (HAC) रेटिंगसह येतो आणि GPS, Wi-Fi, 5G, LTE आणि Bluetooth सह कनेक्टिव्हिटी फीचर्स यात युजर्सना मिळेल. पावरसाठी Nokia G300 5G स्मार्टफोन ४, ४७० mAh लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज असेल तसेच, १४.४ तासांपर्यंतचा टॉक टाइम, २८ दिवस आणि ११.५ तासांचा स्टँडबाय टाइम ऑफर करेल असेही म्हटले जात आहे . स्मार्टफोनचे वजन ७.४१ औंस (सुमारे २१० ग्रॅम) असेल. लीकनुसार, Nokia G300 5G मध्ये गोलाकार मागील कॅमेरा मॉड्यूल आणि वॉटरड्रॉप-स्टाइल डिस्प्ले नॉच असेल. याव्यतिरिक्त Nokia परवानाधारक ने Nokia G300 5G बद्दल अद्याप इतर कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39RfLni

Comments

clue frame