मस्तच! स्वस्तात मिळतोय १०८MP कॅमेऱ्यासह येणारा Xiaomi चा ‘हा’ ५जी स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : गेल्याकाही दिवसात भारतीय बाजारात अनेक ५जी लाँच झाले आहेत. तुम्ही देखील ५जी फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच हँडसेटबाबत माहिती देत आहोत, ज्याची किंमत २२ हजार रुपयांपेक्षा कमी आहे व यात १०८ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. या फोनला तुम्ही डिस्काउंटसह खरेदी करू शकता. वाचा: स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट वर लिस्टेड आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनची किंमत २१,९९९ रुपये आहे. मात्र, एसबीआय क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्हाला यावर इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याबाबतची माहिती अ‍ॅमेझॉनवर दिली आहे. Mi 10i 5G स्पेसिफिकेशन्स Mi 10i 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा डॉट डिस्प्ले असून, यात सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये ऑक्टोकोर स्नॅपड्रॅगन ७५०जी प्रोसेसर दिला आहे. हा फोन ५जी सपोर्टसह येतो. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले असून, स्टोरेजला ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता. Mi 10i 5G चा कॅमेरा सेटअप Mi 10i 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सल आहे. दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल आहे. अन्य २-२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरा आहेत. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Mi 10i 5G चे अन्य फीचर्स Mi 10i 5G मध्ये ३३ वॉट फास्ट चार्जर सपोर्टसह ४८२० एमएएचची बॅटरी मिळतो. फोन अँड्राइड १० एमआय यूआय १२ वर काम करतो. सुरक्षेसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3APvyyK

Comments

clue frame