Motorola Edge 20 Pro आज होणार भारतात लाँच, मिळणार 'हे' दमदार फीचर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: आज, म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार असून या नवीन स्मार्टफोनचा लॉंचिंग इव्हेंट दुपारी १२ वाजता सुरू होईल. या आगामी डिव्हाइसमध्ये, युजर्सना १४४ Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळेल. त्याची स्क्रीन HDR10+ला सपोर्ट करेल. याशिवाय, Motorola Edge 20 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट, १०८ एमपी कॅमेरा आणि 8GB LPDDR5जीबी रॅम दिली जाऊ शकते. पाहा डिटेल्स. वाचा: Motorola Edge 20 Pro किंमत आणि उपलब्धता : लीक्सनुसार , Motorola Edge 20 Pro स्मार्टफोनची किंमत ५०,००० ते ६०,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. फोनच्या वास्तविक किंमतीची माहिती लाँचिंग इव्हेंटनंतरच उपलब्ध होईल. फोनची मायक्रोसाइट ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर लाईव्ह झाली असून या हँडसेटची विक्री फक्त फ्लिपकार्ट वर होईल असे त्यावरून स्पष्ट होते. Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन AMOLED डिस्प्लेसह येईल, ज्याचा रिफ्रेश रेट १४४ Hz असेल. स्क्रीन HDR10+ला सपोर्ट करेल. तसेच संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ दिला जाईल. याशिवाय, क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज देखील हँडसेटमध्ये मिळू शकते. Motorola Edge 20 Pro कॅमेरा : Motorola Edge 20 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात प्रथम १०८ एमपी मुख्य लेन्स, दुसरा ८ एमपी टेलिफोटो लेन्स आणि तिसरा १६ एमपी अल्ट्रा वाइड + मॅक्रो लेन्स असेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ एमपी कॅमेरा मिळेल. Motorola Edge 20 Pro बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी : Motorola Edge 20 Pro मध्ये ४५०० mAh ची बॅटरी दिली जाईल. जी ३० W टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल आणि १० मिनिटांच्या चार्जमध्ये यात ९ तासांचा बॅकअप देईल. याशिवाय, वाय-फाय, जीपीएस, ड्युअल सिम स्लॉट, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये फोनमध्ये उपलब्ध असतील. हे डिव्हाइस अँड्रॉइड ११ वर काम करेल. मोटोरोलाने ऑगस्टमध्ये Motorola Edge 20 Fusion भारतात लाँच केला होता . या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत २१,४९९ रुपये आहे. Motorola Edge 20 Fusion मध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. यासोबतच फोनला मीडियाटेक 9800U 5G प्रोसेसर आणि ५००० mAh बॅटरीचा सपोर्ट मिळत असून हे डिव्हाइस अँड्रॉईड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते . वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AXXvok

Comments

clue frame