Jio च्या 'या' प्लानसमोर सगळेच फेल, १५० GB कधीही-कसाही वापरा, प्लानची किंमत फारच कमी, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली: Prepaid प्लान्स प्रमाणे पोस्टपेड प्लान्सना प्राधान्य देणारे बरेच लोक आहेत. टेलिकॉम कंपन्यांबद्दल सांगायचे तर , लोकांच्या गरजा लक्षात घेऊन, ते पोस्टपेड प्लान्स ऑफर करतात. यात रिलायन्स असो किंवा Airtel-Vi, या कंपन्या कायमच एकपेक्षा एक भन्नाट प्लान्स ग्राहकांसाठी ऑफर करतात. आज आम्ही jio च्या अशाच एका प्लानबद्दल सांगत आहो. पाहा डिटेल्स. वाचा: Jio पोस्टपेड प्लस प्लान: या प्लानची किंमत ७९९ रुपये आहे. हे या प्लानचे रेंटल आहे. या प्लानमध्ये १५० जीबी डेटा देण्यात येत असून प्लान दैनंदिन आधारावर डेटा प्रदान करत नाही. तुम्ही हा डेटा तुम्हाला हवा तेव्हा कधीही वापरू शकता. यामध्ये FUP मर्यादा नाही. हा डेटा संपल्यानंतर, प्रति जीबी १० रुपये शुल्क भरावे लागेल. या प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओव्हर सुविधा दिली जात आहे. हा एक कुटुंब प्लान असून यात अतिरिक्त २ युनर्सना जोडले जाऊ शकते. तसेच, कोणत्याही नेटवर्क नंबरवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग यात करता येते. सोबतच, दररोज १०० मेसेजेस देखील देण्यात येत आहे. डेटाचा विचार केला तर या प्लानची किंमत ७९९ रुपये आहे आणि त्यात १५० जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच , यात डेटाची किंमत दररोज ६ रुपयांपेक्षा कमी असेल. Airtel-Vi प्लान: Airtel कडे ९९९ रुपयांमध्ये जिओ सारख्या फायद्यांचा प्लान आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एस प्लॅनमध्ये १५० जीबी डेटा दिला जातो. हे दैनंदिन आधारावर डेटा प्रदान करत नाही. तुम्ही हा डेटा तुम्हाला हवा तेव्हा कधीही वापरू शकता. यामध्ये FUP मर्यादा नाही. हा देखील एक फॅमिली प्लान आहे. ज्यात, अतिरिक्त २ लोक जोडले जाऊ शकतात. तसेच, कोणत्याही नेटवर्क नंबरवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग करता येते. त्याचबरोबर, दररोज १०० SMS देखील दिले जात आहेत.सोबत, डिस्ने हॉटस्टारची सदस्यता देखील उपलब्ध आहे. Vi चा ९९९ रुपयांचा प्लान आणि ६९९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात डेटा कमी दिला जातो. ९९९ रुपयांचा प्लान तीन कनेक्शनसाठी आहे. या प्लानमध्ये प्राथमिक कनेक्शनला १४० जीबी डेटा दिला जातो. हे दैनंदिन आधारावर डेटा प्रदान करत नाही. तुम्ही हा डेटा तुम्हाला हवा तेव्हा कधीही वापरू शकता. यामध्ये FUP मर्यादा नाही. या प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओव्हर सुविधा दिली जात आहे. ही देखील एक कुटुंब योजना आहे ज्यात अतिरिक्त २ लोक जोडले जाऊ शकतात. तसेच, कोणत्याही नेटवर्क नंबरवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करता येते. त्याचबरोबर दरमहा ३००० मेसेजेस देखील दिले जात आहेत. उर्वरित दोन युजर्सना ४० जीबी डेटा यात दिला जातो. हे दैनंदिन आधारावर डेटा प्रदान करत नाही. तुम्ही हा डेटा तुम्हाला हवा तेव्हा कधीही वापरू शकता. यामध्ये FUP मर्यादा नाही. या प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओव्हर सुविधा दिली जात आहे. तसेच, कोणत्याही नेटवर्क नंबरवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग करता येते. त्याचबरोबर दरमहा ३००० मेसेजेस तुम्हाला यात मिळतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A6zMRH

Comments

clue frame