Jabra Elite 7 Pro, Jabra Elite 7 Active सह इतर ईयरबड्स लाँच, किंमत खूपच कमी, पाहा फीचर्स

नवी दिल्ली: Jabra Elite 7 Pro, Jabra Elite 7 Active, आणि Jabra Elite 2 True Wireless Stereo (TWS) भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. किंमतीबद्दल सांगायचे तर, ची किंमत १८,९९९ रुपये, ची किंमत १५,९९९ रुपये, Jabra Elite 3 ची किंमत ६,९९९ रुपये आणि Jabra Elite 2 ची किंमत ५,९९९ रुपये आहे. Jabra Elite 3 हलका बेज, गडद राखाडी आणि नेव्ही रंगात उपलब्ध केला जाईल. तर, Jabra Elite 2 डार्क ग्रे आणि नेव्ही रंगांमध्ये उपलब्ध केले जाईल. Jabra Elite 7 pro आणि च्या रंग पर्यायांचे डिटेल्स अद्याप उपलब्ध नाही. वाचा: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात Jabra Elite 2 आणि Jabra Elite 3 विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. तर, Jabra Elite 7 Pro आणि Jabra Elite 7 Active ऑक्टोबरच्या शेवटी उपलब्ध केले जातील. हे डिव्हाइस अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स आणि जबराच्या अधिकृत पुनर्विक्रेतांद्वारे खरेदी केले जाऊ शकतात. Jabra Elite 7 Pro ची वैशिष्ट्ये: Jabra Elite 7 Pro TWS इयरफोनमध्ये कंपनीचे मल्टीसेन्सर व्हॉइस तंत्रज्ञान आहे, जे बोन कंडक्शन सेंसर, ४ मायक्रोफोन आणि अल्गोरिदम एकत्र करून तयार करण्यात आले आहे. यात अड्जस्ट ANC वैशिष्ट्य, इनबिल्ट अलेक्सा, सिरी आणि गुगल असिस्टंट सपोर्ट आहे. हे डिव्हाइस IP55 रेटेड आहे. जे, धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करते. हे Jabra साउंड+ अॅप आणि ब्लूटूथ ५.२ चे समर्थन करते. तसेच, ८ तास नॉन-स्टॉप प्लेटाइम प्रदान करते. चार्जिंग केससह ३० तासांची बॅटरी लाइफ यात युजर्सना मिळेल. इयरफोन्स केस फास्ट चार्जिंगला समर्थन देत असून ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १ तास प्लेटाईम देखील यात मिळतो असा कंपनीचा दावा आहे. Jabra Elite 7 Active ची वैशिष्ट्ये: Jabra Elite 7 Active इयरबड्स Jabraच्या मल्टीसेन्सर व्हॉइस तंत्रज्ञानासह एएनसी आणि हियरथ्रूसह देखील येतात. ज्यांना फिटनेस आवडतो त्यांना हे फीचर आवडेल. कंपनीचे म्हणणे आहे की, इयरबड्सवर शेकग्रिप कोटिंग आहे. तसेच, ईयरटिप्स लिक्विड सिलिकॉन रबरचे बनले असून हे मायक्रोफोनसह सादर करण्यात आले आहे. यात एका चार्जिंगवर ८ तास बॅटरी लाइफ आणि चार्जिंग केससह ३० तास बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. Jabra Elite 3 ची वैशिष्ट्ये: Jabra Elite 3 TWS इयरबड्स ६ मिमी ड्रायव्हर आणि ४ मायक्रोफोन कॉल तंत्रज्ञानासह येत असून हे डिव्हाइस क्वालकॉम aptX HD ऑडिओ आणि आवाज अलगाव समर्थित आहे. हे इअरबड एकाच चार्जवर ७ तास बॅटरी लाईफ देतात. चार्जिंग केससह वापरल्यास ते २८ तासांपर्यंत बॅटरी लाईफ प्रदान करतात. डिव्हाइस IP55 रेटेड आहे जे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करते. Jabra Elite2 ची वैशिष्ट्ये: Jabra Elite 2 बजेट श्रेणीत लाँच करण्यात आले असून ६ मिमी ड्रायव्हर्स आणि उच्च ऑडिओ गुणवत्ता प्रदान करते. सानुकूल करण्यायोग्य ईक्यू, नॉइस आयसोलेशन आणि इन्क्लुजन सारखी वैशिष्ट्ये त्यात देण्यात आली आहेत. हे Qualcomm aptX HD ऑडिओ कोडेक सपोर्टसह येते. यात ब्लूटूथ ५.२ चा सपोर्ट आहे. डिव्हाइस दोन-माइक कॉल तंत्रज्ञानासह सुसज्ज असून एकाच चार्जवर ७ तास बॅटरी लाईफ देतात. चार्जिंग केससह वापरल्यास २८ तासांपर्यंत बॅटरी लाईफ यात युजर्सना मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zHJBFr

Comments

clue frame