Instagram मध्ये आढळला ‘बग’, iPhone 13 यूजर्स वैतागले; कंपनीने जारी केले अपडेट

नवी दिल्ली : ने यूजर्ससाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. हे खासकरून आणि यूजर्ससाठी आहे. या दोन्ही फोनमध्ये वापरताना समस्या जाणवत आहे. इंस्टाग्राम अपडेटद्वारे ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. वाचा: iPhone 13 आणि iPhone 13 Pro चे यूजर्स वैतागले iOS 13 बीटानंतर यूजर्सला इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये समस्या जाणवत आहे. iOS बीटा जारी केल्यापासून यूजर्सला सोशल मीडिया अ‍ॅप वापरताना अडथळा येत आहे. यूजर्सचा फोन सायलेंट मोडवर असल्यावर इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये आवाज ऐकू येत नाही. मीडिया वॉल्यूम वाढवल्यानंतर देखील स्टोरीज म्यूटच राहते. याशिवाय फोनमध्ये अ‍ॅपच्या लेआउटबाबत देखील यूजर्स समस्या जाणवत आहे. ही समस्या देखील नवीन अपडेटद्वारे सोडवली जात आहे. लोकांच्या तक्रारीनंतर इंस्टाग्राने आयओएस यूजर्ससाठी अपडेट जारी केले आहेत, जेणेकरून बग्स दूर करता येईल. इंस्टाग्रामने २०६.१ अपडेटद्वारे स्टोरीज म्यूट होण्याची समस्या सोडवली आहे. लेआउटशी संबंधित समस्या देखील अपडेटद्वारे दूर झाली आहे. नवीन नॉच डिझाइनमुळे इंस्टाग्राम अ‍ॅपला आयओएस स्टेट्स बारमध्ये प्लेस करण्यात आले होते. त्यामुळे अ‍ॅपच्या सर्च फंक्शनचा वापर करणे व इंस्टाग्राम मेसेज पाहताना समस्या जाणवत होती. तुम्हाला देखील ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही इंस्टाग्राम अपडेट करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o6N4el

Comments

clue frame