४ ऑक्टोबर नाही तर 'या' दिवशी सुरु होणार अॅमेझॉन Great Indian Festival, कंपनीने बदलली तारीख, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ज्या सेलची सर्व ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत तो Amazon इंडिया चा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल आता ४ ऑक्टोबर ऐवजी ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याआधी, कंपनीने हा सेल ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. पण, प्रतिस्पर्धी फ्लिपकार्टने एक दिवस आधी त्यांचा फेस्टिव्ह डे सेल' सुरू करण्याची केलेली घोषणा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा: गेल्या वर्षी प्रमाणे या वेळीही दोन प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांमधील ही स्पर्धा अतिशय कठीण मानली जात आहे . आगामी सणासुदीच्या आधी दोन्ही कंपन्यांचा 'मेगा सेल' ३ ऑक्टोबरपासून सुरू होईल. चा '' सेल आठ दिवस सुरु राहणार असून Amazon India चा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल सुमारे एक महिना राहणार. Amazon ने सांगितले की, ही विक्री लाखो छोट्या विक्रेत्यांना समर्पित आहे, ज्यात ४५० शहरांमधील ७५,००० हून अधिक स्थानिक दुकानांचा समावेश आहे, जे देशभरातील ग्राहकांना त्यांची उत्पादने देतात. अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी रविवारी सांगितले, “आमचे सर्वात मोठे प्राधान्य आमचे ग्राहक, विक्रेते आणि विशेषत: भारतभरातील लाखो लहान विक्रेते आणि हजारो स्थानिक दुकानदारांच्या भल्याबद्दल विचार करणे हे आहे. आम्ही, आमचे भागीदार, लघु व्यवसाय आणि ग्राहकांसाठी आगामी सणासुदीच्या तयारीसाठी नवीन शोध सुरू ठेवू. कंपनी लवकरच या प्रकरणी अधिक तपशील शेअर करेल. अॅमेझॉन सेलमध्ये १, ००० हून अधिक नवीन उत्पादने सादर केली जातील: शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये अॅमेझॉन लाँचपॅड, Amazon सहेली, Amazon कारिगर तसेच अॅमेझॉन विक्रेत्यांची उत्पादने विविध श्रेण्यांमधील शीर्ष भारतीय आणि ग्लोबल ब्रँड्स अंतर्गत प्रदर्शित केली जातील. महोत्सवात Smasung,OnePlus, Xiaomi, Sony , Apple , Boat , Lenovo , HP, Asus, Fossil, बिबा, अलेन सोली, Adidas इत्यादी शीर्ष ब्रॅण्डचे १,००० हून अधिक नवीन प्रोडक्टस लाँच होतील. ग्राहक फ्लिपकार्ट आणि मिंत्रावरही विक्रीचा लाभ घेऊ शकतील: याआधी, फ्लिपकार्टने ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान द बिग बिलियन डेज सेलच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. पण, वॉलमार्टच्या मालकीच्या कंपनीने शनिवारी विक्रीची तारीख बदलून ३ ऑक्टोबर केली, जी १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. फ्लिपकार्ट ग्रुपची कपडे आणि संबंधित उत्पादने कंपनी Myntra ३ ते १० ऑक्टोबर दरम्यान 'बिग फॅशन फेस्टिव्हल' आयोजित करत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CQf75S

Comments

clue frame