५ वर्षांच्या वॉरंटीसह Fairphone 4 स्मार्टफोन लाँच, फीचर्स तर मस्तच, पाहा किंमत किती?

नवी दिल्ली: नुकताच लाँच करण्यात आला असून एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. जे युजर्सना नक्कीच आवडतील. यात ८ जीबी पर्यंत रॅम आणि स्नॅपड्रॅगन ७५० G 5G प्रोसेसर आहे. तसेच, फोनमध्ये २५६ GB पर्यंत स्टोरेज देखील देण्यात आले आहे. हे डिव्हाइस सध्या भारताबाहेर सादर करण्यात आले आहे. जाणून घेऊया फेअरफोन 4 स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये. वाचा: Fairphone 4 किंमत आणि उपलब्धता: Fairphone 4 ची किंमत ५७९ EUR पासून म्हणजे सुमारे ४९,८०० रुपयांपासून सुरू होते. ही त्याची ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज ची किंमत आहे. तर, ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR ६४९ म्हणजे सुमारे ५५,८४५ रुपये आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर २५ ऑक्टोबरपासून Fairphone 4 ची विक्री सुरु करण्यात येईल. फोनचा बेस व्हेरिएंट ग्रे कलरसह येत असून इतर व्हेरिएंट्स हिरव्या, राखाडी रंगात येतात. Fairphone 4 ची वैशिष्ट्ये: हा फोन अँड्रॉइड ११ वर काम करतो. यात ६.२ इंच फुल-एचडी + आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. ज्याचे, पिक्सेल रिझोल्यूशन १०८० x२३४० आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो १९.५: ९ असून हे डिव्हाइस पिक्सेलवर्क तंत्रज्ञानासह येते. त्यावर गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण देण्यात आले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 750G 5G SoC प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्ड द्वारे २ टीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सेलचा आहे. हे डिव्हाइस सोनी IMX582 सेन्सरसह येते. त्याचे अपर्चर f/१.६ आहे. दुसरे सेन्सर देखील ४८ मेगापिक्सेलचे असून अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. तिसरा २५ मेगापिक्सलचा सोनी IMX576 सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ३९०५ mAh ची बॅटरी आहे. जी, ३० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन/एसी, 5G, 4G एलटीई, ब्लूटूथ v5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी, यूएसबी ओटीजी सारखी सुविधा देण्यात आली आहे. हे डिव्हाइस IP54 रेटिंगसह येते. फेअरफोनची MIL810G मानका अंतर्गत ड्रॉप चाचणी देखील करण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ing4uy

Comments

clue frame