नवी दिल्लीः सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी 'बिग टीव्ही फेस्टिवल' सुरू केला आहे. कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने त्यांच्या टीव्ही व डिजिटल अप्लायन्सेसवर दोन स्पेशल ऑफर्स लाँच केल्या आहेत. यात बिग टीव्ही फेस्टिवल आणि होम लाइक नेव्हर बीफोर या दोन ऑफर्सचा यात समावेश आहे. या सेल मध्ये आकर्षक उत्पादन ऑफर्स, तसेच आकर्षक फायनान्स योजनांसह कॅशबॅक, खात्रीदायी गिफ्ट्स व सुलभ ईएमआय मिळू शकणार आहे. हा सेल देशभरातील सर्व प्रमुख ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्समध्ये २५ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वैध असणार आहे. सध्या मोठ्या स्क्रिन आकाराच्या टीव्हींसाठी मागणी वाढत आहे. बिग टीव्ही फेस्टिवल निवडक ५५ इंच व त्यावरील आकाराच्या निओ क्यूएलईडी व क्यूएलईडी टीव्ही आणि ७२ इंच व त्यावरील आकाराच्या क्रिस्टल ४के यूएचडी टीव्हींच्या खरेदीवर वैध असेल. यामुळे तुम्हाला प्रीमिअम सिनेमॅटिक अनुभव, सर्वोत्तम मनोरंजन, सुधारित उत्पादकता व कनेक्टीव्हीटीचा आनंद घेता येईल. या ऑफरसह ग्राहकांना निवडक टीव्हींच्या खरेदीवर महागडा साऊंडबार मोफत मिळू शकतो, तसेच जवळपास २० टक्के कॅशबॅक, १,९९० रूपयांपासून सुरू होणारे ईएमआय, टीव्हींवर ३-वर्षे कम्प्लीट वॉरण्टी आणि निवडक क्यूएलईडी टीव्हींवर १०-वर्षे नो स्क्रिन बर्न-इन वॉरण्टीचा लाभ घेऊ शकतात. सॅमसंग क्यूएलईडी टेलिव्हिजन्स सॅमसंगचा क्यूएलईडी टीव्ही प्रीमिअम टीव्हीवर आकर्षक डिझाइन दिली आहे. क्यूएलईडी टीव्हींमध्ये ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साऊंड (ओटीएस) आणि अॅक्टिव्ह वॉईस अॅम्प्लीफायर (एव्हीए) देखील आहे. सॅमसंग मायक्रोवेव्ह्ज सॅमसंगने खास भारतासाठी बनवण्यात आलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हन्समध्ये नाविन्यता आणत भारतीय कूकिंगमध्ये क्रांतिकारी बदल आणला आहे. ग्राहक आता नवीन मायक्रोवेव्ह रेंजमध्ये रोटी/नान व दहीसह मसाला, तडका आणि सन-ड्राय फूड तयार करू शकतात. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i8vcvP
Comments
Post a Comment